कै.बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते याचा अभिमान - नरेंद्रशेठ जैन
रायगड वेध अनिल पवार नागोठणे
कोकण एज्युकेशन सोसायटीचे कै. बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील श्रीम. गु.रा.अग्रवाल विद्यामंदिर माध्यमिक शाळा तसेच के. स.प्र.जैन कनिष्ठ महाविद्यालयात नागोठणे पंचक्रोशीसह रोहा तसेच पाली तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम दर्जाचे शिस्तबद्ध शिक्षण मिळत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार शाळा समितीचे चेअरमन नरेंद्रशेठ जैन यांनी काढले. याचबरोबर ग्रामीण भागातील शाळा असुनही शाळेतून प्रत्येक वर्षी अनेक गुणवंत विध्यार्थी उत्तम प्रकारे गुण मिळवुन पुढील उच्च शिक्षण घेत असतात. दरवर्षी आपल्या शाळेतील विज्ञान शाखेचा निकाल उत्तमच लागत असतो त्याच प्रमाणे कला वाणिज्य शाखेचा निकाल देखील उत्तम प्रकारे लागत असतो. दरवर्षी आपल्या शाळेतील १०वी आणि १२वी तील जास्तीत जास्त विद्यार्थी हे प्रथम क्षेणीत उत्तीर्ण होत असतात. त्यामुळेच शाळेचे संपूर्ण रायगड जिल्ह्यात नाव आहे.याला कारण म्हणजे शाळेतील कष्ठाळु व अभ्यासु गुरुजन. या नाव लौकीकतेमुळे दरवर्षी शाळेत ११ वी साठी प्रवेश घेण्यासाठी नेहमीच चढाओढ लागलेली असते परंतु सर्वांना प्रवेश देणे शक्य होत नाही. रोहा, पाली तालुक्यात कॉलेज आहेत परंतु तेथील विध्यार्थी देखील आपल्या शाळेत प्रवेशासाठी धडपड करत असतात असेही जैन यांनी उपस्थितांना आवर्जून सांगितले.
कोएसोच्या नागोठणे येथील कै.बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील माध्यमिक विद्यालय व कै. स. प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालयातील १० वी व १२ वी च्या सन २०२२-२३ या वर्षातील बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गुरुवारी (दि.६) सकाळी ११ वा. विद्यासंकुलनातील सभागृहात शाळा समितीचे चेअरमन नरेंद्रशेठ जैन यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी उपस्थित विध्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी विद्यासंकुलनाचे प्राचार्य अनंत चिनके, शाळा समिती सदस्य अनिल काळे, ॲड. सोनल जैन, निवृत्त शिक्षक बी.एम.सोलेगावकर, शिक्षक प्रतिनिधी ए. आर. गावित, शिक्षकेतर प्रतिनिधी संतोष गोळे, सकाळ सत्र प्रमुख एन. एन. गायकवाड, दुपार सत्र प्रमुख आर. टी. जेडगे, आर.के.जगताप, कांचन पारंगे,साक्षी शिंदे,संध्याराणी सरगडे, मेघना म्हात्रे,मानसी शिंदे, कैलास गाडे,अमित म्हात्रे, प्रगती बहुरुपी आदी शिक्षकांसह पालक प्रतिनिधी दत्ता श्रीवर्धनकर तसेच विध्यार्थी व पालक उपस्थित होते.
दरम्यान यावेळी १० वी तून प्रथम क्रमांक मिळविणारी विद्यार्थीनी सुष्टी दत्ता श्रीवर्धनकर, द्वितीय ब्रिजेश शिवनरेश मौर्या, तृतीय श्रावणी योगेंद्र चौलकर तर १२ वी विज्ञान शाखेचे विध्यार्थी प्रथम नवनीत ललित लेंडी, द्वितीय अक्षता संजय खाडे, तृतीय क्रमांक तेजस मगन चव्हाण, वाणिज्य शाखेतील विध्यार्थी प्रथम शितल रमेश भोईर, द्वितीय दक्षता वासुदेव पाटील, तृतीय राहुल चंद्रकांत म्हात्रे तसेच कला शाखेतील विध्यार्थी प्रथम खुशी संजय सिंग, द्वितीय वैष्णवी प्रमोद पाटील, तृतीय दर्पण गजानन भोईर आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा समिती चेअरमन नरेंद्रशेठ जैन, सदस्य अनिल काळे, ॲड. सोनल जैन यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनंत चिनके, सूत्रसंचालन संध्याराणी सरगडे यांनी तर आभार प्रदर्शन एन. एन. गायकवाड यांनी केले.