Type Here to Get Search Results !

पाणीपुरवठा योजनेतील कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदेचा भ्रष्टाचार उघड, सरपंच व सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश : फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा


पाणीपुरवठा योजनेतील कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदेचा भ्रष्टाचार उघड 

सरपंच व सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश : 

फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा 

रायगड वेध अनिल पवार नागोठणे 

राज्यात विविध भ्रष्ट्राचार प्रकरणी अनेक दिग्गजांना जेलची हवा खाण्याची वेळ आल्याचे आपण पाहिले आहे. असे असूनही त्यापासून बोध न घेता आपले कुणीही काही करू शकत नाही अशा तोऱ्यात असणाऱ्या कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे यांना कोकण विभागीय आयुक्तांनी  वर्षांपूर्वी चांगलीच चपराक दिली होती. असे असतानाच राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत नागोठण्याजवळील कडसुरे(ता.रोहा) गावातील नळ पाणीपुरवठा योजनेतील प्रचंड भ्रष्ट्राचार प्रकरणी दोषी ठरवत अपिलार्थी राजेंद्र शिंदे यांना आता मा. मंत्री ग्रामविकास मंत्रालय, मुंबई यांच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेण्यात आलेल्या सुनावणी अंती महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम.क्र. ३ कलम ३९(१) अन्वये सरपंच व सदस्य पदावरूनही काढून टाकण्या संदर्भात देण्यात आलेला कोकण आयुक्तांचा आदेश कायम ठेवत पुढील कार्यवाहीसाठीचा आदेश १९ जून, २०२३ रोजी मा. ग्रामविकास मंत्रालयाने दिले आहेत. या आदेशाची प्रत मिळताच, उशिरा का होईना सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचा व सत्याचा विजय झाल्याचा आनंद कडसुरे ग्रामस्थांनी फटाके वाजवून साजरा केला. दरम्यान या प्रकरणी गटविकास अधिकारी रोहा यांचेकडे सरपंच राजेंद्र शिंदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा  तसेच अपहरीत रक्कम रु. १६,३०९८७/- इतकी रक्कम वसूल करण्यात यावी यासाठी दि. २६ जून २०२३ रोजी पत्र व्यवहार केला असून राजेंद्र शिंदे यांच्यावर लवकरात लवकर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही ग्रामस्थ १० जुलै २०२३ रोजी पासून पंचायत समिती रोहा कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसु असा सज्जड इशारा कडसुरे ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला.   
दरम्यान कडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेत पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष व विद्यमान सरपंच राजेंद्र यशवंत शिंदे यांनी वर्कऑर्डर प्रमाणे काम न करता तसेच सुमारे सहा कि.मी. पाईप लाईनच्या कामात फक्त तीन कि.मी. चे काम केले तेही खोदकाम न करता, याचबरोबर वर्क ऑर्डर मध्ये नमूद वस्तू न वापरता या योजनेतून लाखों रुपयांचा भष्ट्राचार केला असल्याची तक्रार कडसुरे ग्रामस्थ महेश गोपाळ शिंदे, दिलीप शिंदे, पांडुरंग शिंदे व इतर ग्रामस्थांनी यांनी २६ डिसेंबर २०१९ रोजी रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे हे पाणी पुरवठा योजनेतील भष्ट्राचाराबाबत जबादार असल्याचा अभिप्राय रायगड जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोकण आयुक्तांना दिला होता. नंतर आयुक्त विलास पाटील यांनी सखोल चौकशी केल्यानंतर हे आदेश पारित केले होते. मात्र यावेळी सरपंच राजेंद्र शिंदे यांनी मा. ग्रामविकास मंत्रालय यांच्या न्यायालयात अपील दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून राजेंद्र शिंदे यांना या भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवले असून कोकण आयुक्तांनी दिलेला आदेश कायम ठेवला. या आदेशाची प्रत अर्जदार कडसुरे ग्रामस्थांकडे देण्यात आली आहे.

या आदेशाबाबत जेष्ठ ग्रामस्थ दिलिपमहाराज शिंदे यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य तक्रारदार महेश शिंदे,माजी सरपंच दत्तात्रेय शिर्के, दिलीप शिंदे, पांडुरंग शिंदे, अरुण शिर्के, रविंद्र शिर्के, रमेश शिर्के, रमण जाधव, यशवंत शिर्के, रघुनाथ शिर्के, भानुदास शिंदे, ज्ञानदेव शिंदे, सुनिल शिंदे, संदिप शिंदे, पंडित तुपकर, रोशन जाधव, रामभाऊ शिर्के, अनिल शिंदे, तेजस शिर्के, रोहिदास शिर्के, संदीप शिर्के, संजय शिर्के, भास्कर तुपकर, दिपक शिर्के आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. 

 यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना या लढ्याचे मुख्य शिलेदार महेश शिंदे, दत्तात्रेय शिर्के, दिलिप शिंदे महाराज व पांडुरंग शिंदे यांनी सांगितले की, आमच्या गावात पाणी पुरवठा योजनतील भष्ट्राचार प्रकरण ग्रामस्थांच्या चर्चेतील गेले चार वर्षे महत्वाचा विषय होता. आता आम्हाला या प्रकरणी न्याय मिळाला याचा आम्हा ग्रामस्थांना निश्चितच आनंद झाला आहे. तर आजचा हा दिवस कडसुरे गावाच्या इतिहासात ऐतेहासिक दिवस आहे.गावाच्या पाणी पुरवठा योजने बाबतीमध्ये कडसुरे सरपंच राजू शिंदे याने जो प्रचंड भ्रष्टाचार केला होता त्या बाबतीत आमच्या ग्रामस्थांनी विशेषतः यामध्ये पी.के.शिंदे, दिलीप शिंदे, दत्तात्रेय शिर्के, महेश शिंदे व संदिप शिंदे ह्या सर्व मंडळींनी जो लढा दिला त्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाले त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. पुढच्या काळामध्ये आमच्या गावात अशा प्रकारचा भ्रष्टाचार करण्यासाठी कोण धजावणार नाही.तसेच आमच्या या भ्रष्टाचार विरोधी लढ्याला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आमचे नेते ना.उदय सामंत यांनी आम्हाला आधार व पाठिंबा दिला त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचे आभार मानतो व यापुढील काळात आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी ना.उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली गावातील समाजकारण व राजकारण पुढे नेऊ असे पत्रकार परिषदेत गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण शिर्के यांनी सांगितले.

"भ्रष्टाचार कितीचा...

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत कडसुरे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेतील ४९ लाख ५४ हजार ६६१ रकमेची निविदा न वापरता कायद्यानुसार भंग केल्याचे दिसुन येत आहे. तसेच बँक ऑफ इंडियाच्या नागोठणे शाखेतून ११ फेब्रुवारी, २०२० रोजी ३ लाख ५० हजार व १३ फेब्रुवारी, २०२० रोजी २ लाख स्वतःच्या नावे काढून आर्थिक घोटाळा केला असल्याचे स्पष्ट होत असल्याचे आदेशात म्हटले आहे."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test