Type Here to Get Search Results !

म्हसळा तालुक्यातील कोकबल गावात वादळाचा तडाखा◆ 22 घरांचे पत्रे, कौले, कोने, छप्पर तुटून मोठया प्रमाणात नुकसान. ◆ सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.


म्हसळा तालुक्यातील कोकबल गावात वादळाचा तडाखा

◆ 22 घरांचे पत्रे, कौले, कोने, छप्पर तुटून मोठया प्रमाणात नुकसान.

 ◆ सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा 

   म्हसळा तालुक्यातील मौजे कोकबल गावात सोमवारी दि.26 जून 2023 रोजी मध्यरात्री 01:30 वाजता च्या दरम्यान वादळाचा तडाखा बसून गावातील 22 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे.
  याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमवारी मध्यरात्री जोरात पाऊस आणि वारा सुटला होता. या वाऱ्याचे वादळात रूपांतर होऊन तालुक्यातील कोकबल गावातील 22 घरांचे पत्रे उडून गेले तसेच कोने, कौले तुटून पडले आहेत. वादळाचा तडाखा इतका जबरदस्त होता की जांभा दगडाने बांधलेल्या भिंतींनाही मोठंमोठ्या तडा गेल्या आहेत. 
मध्यरात्री सर्व लोकं झोपलेले असताना अचानक घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावात ही बाब समजतात सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना धिर दिला आणि ज्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तजवीज केली.
  नुकसानग्रस्ताना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. रात्रीची वेळ असताना ग्रामस्थ्यांचे हुशारीने वेळीच घरातील मंडळी बाहेर पडली.दैव बलवत्तर असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर दुर्घटनेत केतन शिंदे,रमेश शिंदे,प्रकाश शिंदे,महेश शिंदे,कृष्णा शिंदे,शंकर मांडवकर,रमेश शिगवण,आनंदी शिगवण, सरिता काप,दौलत मांडवकर,बबन मांडवकर,परेश शिंदे,बबन शिंदे,आर्या शिंदे,नरेश येलवे,लीला येलवे,महेश येलवे,गणेश येलवे,मंगेश येलवे यांचे घराचे तसेच सामाजिक सभागृह घर,अंगणवाडी इमारतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
   वादळामुळे झालेल्या नुकसानीत 20 मालकी घरे आणि 2 शासकीय इमारतींचा समावेश आहे. यांपैकी 60 % पेक्षा जास्त नुकसान झालेले 4 घरे, 40% पेक्षा जास्त नुकसान झालेले 16 घरे आणि 1 अंगणवाडी इमारत, 1 सामाजिक इमारत असा समावेश आहे. अशी माहिती नुकसानीचे पंचनामा करताना उपस्थित असलेले ग्रामसेवक योगेश पाटील यांनी दिली आहे.
    कोकबल गावात झालेल्या वादळाने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने शासनाने नुकसान ग्रस्तांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी ग्रामपंचायतिच्या सरपंच सौ.स्नेहा सुनिल सोलकर यांनी केली आहे. तसेच कोकबल गावात झालेल्या वादळामुळे एकही नुकसान ग्रस्त कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी पाहणी करताना नागरिकांना दिली आहे.
तसेच घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, सरपंच स्नेहा सोलकर, तलाठी पांडुरंग कळंबे, ग्रामसेवक योगेश पाटील, पंस.कृषी विस्तार अधिकारी अशोक बाक्कर, अंगणवाडी सेविका अक्षता बिरवाडकर यांसह तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी कोकबल गावात जाऊन पाहणी करून नुकसान ग्रस्त कुटुंबियांना धिर देण्याचा प्रयत्न केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test