गरजू विद्यार्थिनींना सामाजिक संस्थांकडून सायकली भेट
● आम्ही गिरगावकर टीम व श्री रविप्रभा मित्र संस्था यांचा सामाजिक उपक्रम
● शाळेत जाण्यासाठी होणारी पायपीट थांबून अधिक वेळ शिक्षणाकडे देता येईल - रविंद्र लाड यांचे मत
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
आम्ही गिरगावकर टिम व श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील तळा, महाड, म्हसळा तालुक्यातील तळेगाव, साळशेत, नवीन कोळसे, फाळकेवाडी, ताम्हाणे शिर्के गावातील गरजु व शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल वाटप करण्यात आले. जेणेकरून या गरजू विद्यार्थ्यांची जी काही त्यांची शाळेत जाण्यासाठी होणारी पायपीट कमी होऊन अधिक वेळ शिक्षणाकडे देऊ शकतील. याच उद्दिष्टांने सायकली भेट देण्यात आल्या. दोन्ही संस्थांचे एकच उद्दिष्ट आहेत की आम्ही शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक या विषयावर जास्त लक्ष देतो असे रविप्रभा मित्र संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. आता पर्यंत शाळेची इमारती रंगरंगोटी, शाळांमधील शौचालय इमारत दुरुस्ती, UPSC/MPSC परीक्षा मार्गदर्शन शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप करणे असे अनेक उपक्रम आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि अनेक दानशूर समाजसेवक यांचे विशेष महत्वपूर्ण सहकार्यातून राबवित आहोत याचा सार्थ अभिमान असल्याचे रविंद्र लाड यांनी सांगितले.
तळा तालुक्यातील विद्यार्थीनी १) कु.सृष्टी रुपेश कदम, गाव - तळेगाव, इयत्ता ९ वी. २) कु.वैष्णवी एकनाथ मिरगुले, गाव - साळशेत, इयत्ता १० वी, महाड तालुक्यातील १) कु.सानिया संदीप कदम, गाव - फाळकेवाडी, इयत्ता ९ वी, २) कु.ईश्वरी रविकांत अंबावले, गाव - नवीन कोळसे, इयत्ता ९ वी. तसेच म्हसळा तालुक्यातील १)कु.संजना रघुनाथ काप, गाव - ताम्हाणे शिर्के, इयत्ता ७ वी. या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांनी आहेत. या सर्व विद्यार्थीनी शाळेत जाण्यासाठी रोज चार ते पाच किलोमीटर अंतर पायी प्रवास करून शाळेत जावे लागते असे त्यांच्या पालकांनी सांगितले. शाळेत पायी जावे लागत असल्याने मुलींना होणारी गैरसोय लक्षात घेऊन आम्ही गिरगावकर टीम व श्री रविप्रभा मित्र संस्था यांचेकडून मुलींना मोफत सायकली भेट दिल्याने सायकल वाटप प्रसंगी विद्यार्थिनींचे पालकांनी दोन्ही संस्थांचे आभार मानले.
आयोजित सायकल वाटप कार्यक्रमावेळी आम्ही गिरगावकर टिमचे जिल्हा सदस्य नागेश पोतदार, कुणाल लिमजे, विघ्नेश सुंदर, श्री रविप्रभा मित्र संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड, सचिव नितीन रिकामे, संतोष उध्दरकर, सागर सुतार, महाड तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अशिष फळसकर, म्हसळा तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, मंगेश देवरुखकर, कैलास देशमुख, सचिन मोरे, राजु रेवणे, उमेश देशमुख, बिपिन शिंदे, मयूर भुवड, किशोर सर्कले, राज देशमुख, गिरीश मगर, सदानंद शिर्के आदी मान्यवर व पालक उपस्थित होते.