खडकोली रस्त्याचे प्रमोद घोसाळकर यांच्याहस्ते भूमिपूजन.
रायगड वेध अमोल चांदोरकर बोर्ली पंचतन
माणगाव तालुक्यातील लोणेरे पंचायत समिती गणातील खडकोली येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्याच्या २० लक्ष रूपये निधी कामाचे भूमिपूजन शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महाड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भरतशेट गोगावले यांच्या स्थानिक आमदार निधीतून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खडकोली येथे जवळपास १ कीलोमीटर डांबरीकरण कामाचे खडकोली येथे भूमिपूजन करण्यात आले. मांगरूळ हद्दीतील खडकोली गावामधील विकासकामे याआगोदर शिवसेनेच्या माध्यमातून झाली असून नुकत्याच झालेल्या थेट सरपंच निवडणूकीत खडकोली ग्रामस्थांनी सरपंच पदाच्या उमेदवाराला भरभरून मते दिली व शिवसेना विचारांचे ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून दिले त्याचीच पोच म्हणून आमदार भरतशेट गोगावले यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत खडकोली नळपाणी पुरवठा योजना, अंतर्गत डांबरी रस्ते, विद्युत पोल, स्मशानभूमी अशी करोडोंची कामे गेल्या दोन महिन्यांमध्ये मिळाली असून खडकोली ग्रामस्थांनी यापुढे देखील आमदार भरतशेट गोगावले व शिवसेनेच्या पाठीशी ठाम रहावे असे आवाहन दक्षिण रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केले.
यावेळी माजी उपसरपंच प्रताप सावंत, उपविभाग प्रमुख शेखर घोसाळकर, शाखाप्रमुख गणपत राणे, ग्रामपंचाय सदस्य संदेश पवार, संभाजी सावंत, शंकर पवार यांच्यासह खडकोली ग्रामस्थ उपस्थित होते.