Type Here to Get Search Results !

नागोठणे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन, ग्रामपंचायत कार्यालय तसेच भाजपा विभागीय कार्यालयात महामानवाला त्रिवार अभिवादन


नागोठणे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन 

ग्रामपंचायत कार्यालय तसेच भाजपा विभागीय कार्यालयात महामानवाला त्रिवार अभिवादन 

रायगड वेध अनिल पवार नागोठणे 

राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक, दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा देणारे तसेच अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारणारे, महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन करणारे भारतीय घटनेची शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. दरवर्षी या दिवशी देशभरात सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी होत असतानाच नागोठणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात, भाजपा कार्यालयात, रमाईनगर येथील समाज मंदिरात तसेच रामनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करण्यात आले.
नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच रंजना राऊत यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन केले. यावेळी मा. उपसरपंच सुनील लाड, विद्यमान सदस्य मोहन नागोठणेकर, ज्ञानेश्वर साळुंखे, सदस्या ॲड. रुपाली कांबळे, ॲड. महेश पवार,ॲड. प्रकाश कांबळे, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांच्यासह बौध्दाचार्य किसन शिर्के, विजय शिर्के, प्रमोद चौगुले, अशोक गोरे, अमोल ताडकर, पांडूरंग कोळी आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मा. उपसरपंच सुनील लाड यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आठवण करून देत मार्गदर्शन केले. याचबरोबर नागोठणे येथील भाजपा विभागीय कार्यालयात रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महामानवाला अभिवादन केले. यावेळी तालुका सरचिटणीस आनंद लाड, जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, कोषाध्यक्ष प्रमोद गोळे, उपाध्यक्षा अपर्णा सुटे, शिक्षण सेलचे तालुका उपाध्यक्ष धनराज उमाले,जि. प. गट अध्यक्ष शेखर गोळे, शहर सरचिटणीस तिरतराव पोलसानी,विभागीय सरचिटणीस मुग्धा गडकरी, राजन दुबे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 
तसेच रमाईनगर येथील समाज मंदिरात तसेच रामनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करण्यात आले. यावेळी रामनगर येथे मातंग व बौद्धबांधव यांच्या वतीने जयंतीनिमित्त छोटेखानी रॅली काढून यावर्षी प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी नागोठणे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे,ॲड. प्रकाश कांबळे,मातंग समाज सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बाबुलकर, बौद्धसमाज रामनगर मंडळाचे अध्यक्ष महादेव सावंत यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test