Type Here to Get Search Results !

श्रीवर्धन तालुक्यात प्रथमच हरिहरेश्वर येथे भंडारी प्रीमियर लीगची यशस्वी सांगता, मालिकाविर साईराज प्रदिप मुरकर याची निवड


श्रीवर्धन तालुक्यात प्रथमच हरिहरेश्वर येथे भंडारी प्रीमियर लीगची यशस्वी सांगता 

मालिकाविर साईराज प्रदिप मुरकर याची निवड

रायगड वेध संतोष शिलकर वेळास 

श्रीवर्धन तालुक्यात प्रथमच भंडारी समाजातील खेळाडूंसाठी भंडारी प्रीमियर लीग  टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे दि.१४/१५ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते.भंडारी समाजाच्या,खेळाडूंचा क्रिकेट मधील कौशल्य दाखवण्याची उत्तम संधी मिळावी बरोबरच खेळाच्या माध्यमातून संघटन  करणे तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने समाज बांधवांना एकत्र आणणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून द्वारका नगर दांडे येथील  मैदानावर या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत एकूण आठ संघांचा समावेश होता. यामध्ये मालवण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, डोंबिवली,कल्याण,मुरुड-जंजिरा, अलिबाग,म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील खेळाडूंचा सहभाग आहे. बागमांडला दांडा भंडारी समाज अध्यक्ष  विनायक आरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल. प्रतोषभाई कोलथरकर,तसेच  सर्व भंडारी समाज अध्यक्ष व बांधव उपस्थित होते.दरवर्षी श्रीवर्धन तालुक्याच्या ठिकाणी, याही पुढे या सामन्यांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य जपण्याचं हित या पुढे ही साधणार आहेत.सामने जय गणेश स्पोर्ट्स यू ट्यूबच्या माध्यमातूनच सर्वत्र पोहचविण्याचं काम मयुरेश मयेकर या भंडारी बाधवाने केला,स्पर्धेचे औचित्य साधून श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावातील भंडारी समाजाचे अध्यक्ष तसेच विविध पदावर ती कार्यरत असलेले समाजाचे सर्व मान्यवर यांचे सन्मान आणि सत्कार करून समाजाची बांधिलकी जपण्याचा सुंदर प्रयत्न केला.स्पर्धेसाठी अॅक्युराईट फाऊंडेशन यांच बहुमोल सहकार्य लाभले.सदर संस्था श्रीवर्धन तालुक्यात फिल्म प्राॅडक्शन व अकाऊंटीग याबद्दल मार्गदर्शन करत आहे.
या कार्यक्रमाला आखिल भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.नवीनचंद्र बांदिवडेकर तसेच रत्नागिरी भंडारी समाज अध्यक्ष मा.राजू कीर व त्यांच्या समवेत महासंघाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.या स्पर्धे मध्ये खेळाडूंचे मनोधैर्य वाढवून,युवा खेळाडूंना सल्ला दिला,आपले खेळाडू भविष्यात नावारूपाला यावेत यासाठी कोकणातील सिंधूदुर्ग पासून ते डहाणू पालघर पर्यंत क्रिकेट टूर्नामेंट विविध जिल्ह्यातील दोन संघ सहभाग घेतील,या स्पर्धा डे-नाईट टूर्नामेंट म्हणून जिल्हा स्थरीय खेळविण्याचा आश्वासन त्यांनी दिले,

   या स्पर्धेत प्रथम क्रमांक,साईकृपा श्रीवर्धन,पारितोषिक रक्कम ५०,०००/- रुपये द्वितीय पारितोषिक शिवांश इलेव्हन वडवली पारितोषिक रक्कम ३०,०००/- रुपये,सामनाविर, साईराज मुरकर,उत्कृष्ट फलंदाज शुभम मांजरेकर,उत्कृष्ट गोलंदाज साईराज मुरकर,साईकृपा यांचा खेळाडू, खास आकर्षण,श्रीवर्धन शहर सीनियर वर्सेस श्रीवर्धन ग्रामीण सीनियर,श्रीवर्धन ग्रामीण व शहर दोन्ही संघांतील खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

श्रीवर्धन तालुका भंडारी प्रीमियर लीग व्यवस्थापन कमिटी, अमृत पुलेकर, विक्रांत कोलथरकर,अलंकार कोलथरकर, प्रणित कोलथरकर,अमोल पुलेकर,सुयोग पुलेकर,प्रतीक कोलथरकर,अजिंक्य कोलथरकर याने सुंदर नेतृत्व करून एक समाज बांधिलकी जपण्याचं कार्य क्रिकेटच्या माध्यमातून समाजातील तरुण वर्गांना संधी उपलब्ध करून उत्तमरीत्या पार पाडत,अखंड भंडारी समाज ऋणानुबंध जपण्याचं एक  उत्तम प्रयत्न केला आणि प्रथम पर्वाच्या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test