शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या उपस्थितीत पेण येथील पदाधिकाऱ्यांची फेर नियुक्ती
शिवसेनेचे कार्यालय पुन्हा कार्यकर्त्यांनी गजबजले
रायगडमध्ये शिवसेना वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करा - राजाभाई केणी
रायगड वेध प्रशांत पोतदार पेण
काही दिवसांपूर्वीच शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या मीटिंग मध्ये पेण तालुक्यातील शिवसेनेच्या पदांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आज पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत जिल्हा प्रमुख राजा भाई केणी यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी रुपेश पाटील आणि पेण तालुका प्रमुखपदी तुषार मानकवळे यांची फेर नियुक्ती करण्यात आली तसेच तालुक्यातील इतर पदांवरील स्थगिती उठवण्यात आल्याचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी पक्षाच्या आदेशा प्रमाणे आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुक्यातील शिवसेनेच्या पदांची स्थगिती उठविण्यात आली असून पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांच्या फेर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत आता रायगड जिल्ह्यात व पेण तालुक्यात शिवसेना संघटना वाढीसाठी सर्वांनी एकत्र येवून प्रामाणिकपणे काम करायचे आहे.
येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी गाव तिथे शाखा आणि घर तिथे भगवा ही संकल्पना प्रत्येक तालुक्यात राबवायची आहे,यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे त्यांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांच्या पदाच्या स्थगिती नंतर पेण येथील शिवसेना कार्यालय कार्यकर्त्यांविना ओस असलेले दिसुन येत होते परंतु जिल्हा प्रमुख राजा भाई केणी यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नवी संजीवनी दिल्याने पेण तालुका शिवसेना कार्यालय पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी गजबजलेले दिसून आले.तर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजा भाई केनी, उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील, तालुका प्रमुख तुषार मानकवळे, शहर प्रमुख दिनेश पाटील, जिल्हा संघटक बाळा शेठ म्हात्रे, युवासेना प्रमुख योगेश पाटील, महिला संघटीका वंदना पाशिलकर, सरिता पाटील, अश्विनी ठाकूर ,प्रतिभा पाटील,रेखा तांडेल,निलिमा पाटील, नरेश शिंदे,विलास कोळी ,नंदू पाटील, प्रमोद घरत, प्रशांत घरत,चंद्रकांत पाटील, रोहन म्हात्रे, दीपक चरवट,शैलेश पाटील,केतन तनपुरे, विकी मानकवळे यावेळी उपस्थित होते.