अवघ्या तीन महिन्यातच कणघर अंगणवाडी इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळला
◆ ठेकेदाराने केलेल्या बांधकामाचे दर्जावर प्रश्नचिन्ह
◆ तीन महिन्यांपासून चिमुकळ्यांची शाळा दुसऱ्यांच्या घरात
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील गाववाडी, वस्तीवर खासदार सुनिल तटकरे व माजी पालकमंत्री तथा आमदार आदिती तटकरे यांचे प्रयत्नाने करोडो रुपयांची छोटी मोठी विकास कामे झालेली आहेत व अद्याप काही ठिकाणी कामे सुरूही आहेत. म्हसळा तालुक्यातील गावागावात विकास कामांची मालिका सुरू असून ग्रामपंचायत कणघर येथे नवीन अंगणवाडी इमारत बांधण्यात आली आहे.
कणघर येथे नवीन अंगणवाडी इमारत बांधणेसाठी डोंगरी विकास कार्यक्रम या योजनेमधून 08 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर केलेला होता. सदर अंगणवाडी इमारत बांधकाम करणेच काम श्री स्वामी समर्थ सोसायटीच्या नावावर देणेत आले आहे.
ठेकेदारांच्या निष्काळजीमुळे व दुर्लक्षित भूमिकेमुळे मागील तिन महिन्यांपासून चिमुकळ्यांची अंगणवाडी दुसऱ्याच्या घरात भरण्याची वेळ आली आहे.
दिनांक 30/07/2022 रोजी या अंगणवाडी इमारतीचे खासदार सुनील तटकरे यांचा हस्ते उदघाटन करण्यात आले होते. उदघाटनानंतर तीन महिन्यातच अंगणवाडी इमारतीचा स्लॅब कोसळला.या दुर्घटनेची तत्काळ दखल घेऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अंगणवाडीचे निकृष्ठ बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित इंजिनिअर अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी लेखी मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे ग्रामपंचायत कणघर सरपंच यांनी केली आहे. स्थानिक खासदार व आमदार अतोनात प्रयत्न करून म्हसळा तालुक्यात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देत आहेत परंतु ठेकेदार व्यवस्थित दर्जेदार कामे करीत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू पहायला मिळत आहे.
"कणघर येथील अंगणवाडी इमारतीचा काम निकृष्ठ झाला आहे. याबाबत लेखी तक्रार गटविकास अधिकारी यांना दिलेली आहे. अद्याप कोणतीही कारवाई अजून झालेली नाही. संबंधित ठेकेदाराला गटविकास अधिकारी यांनी काळ्या यादीत टाकावे अशी आमची ठामपणे मागणी आहे."
श्री.धनंजय सावंत
उपसरपंच - ग्रामपंचायत कणघर
"कणघर अंगणवाडी इमारत बांधकाम बाबतीत ग्रामपंचायत कणघर सरपंच यांचा तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे. संबंधित ठेकेदाराला काम करून घेण्यास सांगितले आहे. ठेकेदाराने काम केले नाही तर काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येईल."
बी.एस.पोळ
गटविकास अधिकारी - पंचायत समिती म्हसळा