दिवेआगरमध्ये दोन दिवस यात्रोत्सव ,
हथकोडे, गळी फिरणे यात्रेचे मुख्य आकर्षण.
रायगड वेध अमोल चांदोरकर बोर्ली पंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिध्द पर्यटन स्थळ दिवेआगर येथे चैत्रशु. चतुर्दशी व पौर्णिमेला श्रीसिद्धनाथ व श्रीकेदारनाथ यात्रेची लगबग मोठया उत्साहात सुरू आहे. यावर्षी एप्रिलच्या ४ व ५ तारखेला दोन दिवशी यात्रोत्सव साजरा होत आहे.
पुणे, मुंबई प्रमाणे अनेक शहरानजीकचे पर्यटन स्थळ म्हणून दिवेआगर ला खास पसंती दिली जाते. यात्रा उत्सवात पंचक्रोशीतील भक्तजन व पर्यटकांची आवर्जून गर्दी असते. त्यामुळे येथील श्रद्धेने होणारी 'गळी फिरणे' व 'हाथकोडे' यात्रेतील वैशिष्ट्ये ठरत असतात.
या उत्सवात दोन दिवस दिवेआगर गावामधील घरोघरी श्री सिद्धनाथ आणि श्री भैरवनाथाची परडी फिरते. सालाबादप्रमाणे गावातील मंडळीकडून मानपान दिला जातो. गावातील प्रमुख उत्सव असल्याने दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळते. आपली मनोकामना पूर्ण होण्यास भक्तांकडून देवाला साकडे घातलं जाते. 'हाथकोडे' च्या परंपरेनुसार मंदिराच्या आवारात खेळलं जाते. यानंतर पुढे या यात्रेच आकर्षण ठरते ते 'गळी फिरणे' त्यामुळे यात्रोत्सवातील अशा क्षणाची उत्सुकता भक्तगणात आहे.