Type Here to Get Search Results !

पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचा जत्रोत्सव उत्साहात साजरा, खालुबाजाच्या अतिषबाजीत काठ्या पालख्यांचे सहाणेवर झाले आगमन


पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचा जत्रोत्सव उत्साहात साजरा, 

खालुबाजाच्या अतिषबाजीत काठ्या पालख्यांचे सहाणेवर झाले आगमन

रायगड वेध देवेंद्र दरेकर पोलादपूर 

पोलादपूर शहराचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री देव काळभैरवनाथ जोगेश्वरी रवळनाथांचा जत्रोत्सव हा आगळावेगळा व वैशिष्ट्यपूर्ण समाजला जाणारा उत्सव आहे.हा उत्सव आजही शेकडो वर्षाची परंपरा व रुढि जपत साजरा केला जातो. रविवारी भैरवनाथ नगर येथील सहानेवर श्री देव काळभैरवनाथ महाराजांचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी काळभैरवनाथ महाराजांना नतमस्तक होऊन भक्तांनी आकाश पाळणे विविध खाद्यपदार्थांचे दुकाने फिरत्या  चक्रांवर बसण्याचा आनंद रात्रभर लुटला.
   रात्री बारा वाजल्यानंतर पोलादपूर तालुक्यातील काटेतळी, सडवली,चांभारगणी, मोरगिरी, फौजदारवाडी, चरई,वाकण या सात गावातील सजवलेल्या काठ्या पालख्यांचे सहाणेवर खालुबाजाच्या आतिषबाजीत वाजत गाजत आगमन झाले. यावेळी प्रथम सह्याद्रीचे मर्द मराठे सामाजिक संस्था भैरवनाथ नगर यांच्यावतीने आलेल्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर पालख्या सहानेवर विराजमान झाल्या.यावेळी सजवलेल्या सासनकाट्या सहणेवर नाचविण्यात आल्या सदरचे दृश्य गगनाला गवसनी घालणारे होते.
 पहाटे पाच वाजेपर्यंत सात गावातील ग्रामदैवत सहाणेवर विराजमान होते.सात गावातील काठ्या पालख्यांचे एकत्रित असण्यामुळे त्याठिकाणच वातावरण भक्तिमय पाहायला मिळालं.त्यानंतर सर्व काठ्यापालख्या श्री काळभैरवनाथ मंदिराच्या शेजारी टेकडीवर वाजत गाजत नाचवीण्यात आल्या हे सर्व दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबुराव महाडिक,उपाध्यक्ष विजय पालकर, सचिव विजय पवार, खजिनदार शंकर दरेकर, सर्व विश्वस्त,सल्लागार यांनी कार्यक्रमाचे  उत्तम नियोजन केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test