अखेर वारळकरांना मिळणार खरसई धरणाचे पाणी,
● प्रशासनाची ग्रामस्थांचेपुढे नरमाईची भूमिका
● खासदार सुनिल तटकरे यांची यशस्वी मध्यस्थी
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
म्हसळा तालुक्यांत पाणी टंचाई ग्रस्त परिस्थीती सुरु झाली असून, टंचाई ग्रस्त स्थानिक ग्रामस्थांचे विरुध्द संबधीत ग्रामिण पाणी पुरवठा प्रशासन भूमिका घेऊन ठेकेदारांची पुंजी भरण्याचे काम करीत आहे या मुख्य हेतूने आम्ही वारळकर ग्रामस्थ एकवटले आणि थेट आपले श्रद्धास्थान असलेले खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेऊन वारळ साठी खरसई धरणातील पिण्यायोग्य पाणी आणि पाणी शुध्दीकरणाचे प्लँटसह योजना असा ग्रामस्थांचा प्रस्ताव मान्य केला असल्याचे ग्रामस्थानी सांगितले.
यावेळी खासदार सुनिल तटकरे यांचे भेटी दरम्यान सुनित सावंत, शकील साटविलकर यांचे सह वारळ ग्रामस्थ प्रमुख मधुसूदन पाटील, माजी सरपंच जहुर काझी,महेश बिराडी,रफिक काझी,जहुर काजी,नारायण पाटील, रमेश खोत,लहु माळी,अरुण चाळके, संजय चांदोरकर,रूपेश आंबेतकर, अशफाक मुकादम, काशिनाथ पाटील, जनार्दन पाटील, नथुराम पाटील, इम्तियाज काजी,धोंडू पाटील,जनार्दन म्हात्रे,शाम धुमाळ,तनवीर काजी,महेंद्र गोरे,योगेश नाक्ती, योगेश नाक्ती आदी मुंबई आणि वारळ स्थित ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
विकास समिती आणि अखिल वारळगाव यांच्या संयुक्त एकजुटीने खासदार सुनिल तटकरे यांची गिताबाग सुतारवाडी येथे भेट घेऊन आपल्याला खरसई धरणातूनच पाणी मिळावे या मागणीचे लेखी निवेदन दिले होते, या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन खासदार सुनिल तटकरे यांनी वारळ कराना हव्या असलेल्या खरसई धरणातूनच पाणी मिळावा ह्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संर्पक साधून याची कल्पना सुद्धा दिली. चुकीचे सुरु असलेले बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले, कामाला सनदशीर मार्गाने विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर पोट ठेकेदाराला गुन्हे दाखल करायचे असतील तर त्याला माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगा असे खासदार महोदयानी आधिकाऱ्याना सांगितले.
" म्हसळा तालुक्यातील मौजे वारळ गावासाठी ९४ लक्ष २१ हजार रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली. तो स्त्रोत मेंदडी धरणाखालील विहीरीतुन नको तर तो बदलून खरसई धरणातून घ्यावा म्हणून स्थानिक ग्रामस्थानी मागणी लावून धरली असताना प्रशासनाचे हेकेखोरी मुळे नव्याने केलेला प्रस्ताव पुन्हा हेतू़ पुरस्कार मेंदडी पाझर तलावातून आणि नव्याने प्रस्तावित रस्त्याचे सदोष भागांतून ठेकेदार आणि ग्रा.पा.पुरवठा विभागाने दादागीरीने खोदाई केल्याचे ग्रामस्थानी आपल्या तक्रारीत सांगितले. नजरेने आणि प्रत्यक्ष दूषीत आणि जलपर्णीने पिण्यासाठी घातक रंगीत असल्याचे पाणी, ग्रामविकास अधिकाऱ्याने कोणत्या जादूने पिण्यास योग्य केले याबाबतही स्थानिक मेंदडी - वारळ ग्रामस्थांचा आक्षेप आहे.