Type Here to Get Search Results !

अर्धवट गतिरोधकांमुळेच अपघातांची शक्यता, बोर्लीपंचतन भागात पांढरे पट्टे नाही


अर्धवट गतिरोधकांमुळेच अपघातांची शक्यता 

बोर्लीपंचतन भागात पांढरे पट्टे नाही 

रायगड वेध रमेश घरत शिस्ते 

 तालुक्यात रस्त्यांचे डांबरीकरण होत आहे व ठिकठिकाणी गतिरोधक देखील बसवण्यात आले मात्र नियमबाह्य गतिरोधक व पांढरे पट्टे नसल्यानेच आता अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  स्थानिक वाहनचालक व पर्यटन याना अंदाज येत नसल्याने गतिरोधक वरून वाहने आपटण्याच्या घटना घडत आहेत. 

पर्यटनस्थळे असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात सुट्टयांमुळे अनेक पर्यटक येत आहेत शिवाय वीकेंड ला वाहनांची वर्दळ असते. मुंबई- पुण्यावरून येणाऱ्या चालकांना येथील रस्त्यांचा अंदाज नसतो त्यामुळे कसेही वाहने चालवतात. अशातच शिस्ते, वडवली, कापोली व दिवेआगर गावाच्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गतिरोधक बसवले गेलेत. 

स्थनिकांच्या मागणीनुसार गतिरोधक बसविले जात असले तरी या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहनचालकांना त्याचा पटकन अंदाज येत नाही. यामुळे अपघाताच्या घटना घडतात. कापोली येथे काही गतिरोधक तर डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या एका बाजूवर आहे व दुसऱ्या बाजूला ते नसल्याने वाहने सुसाट धावतात. प्रत्यक्षात कंत्राटदाराचे काम पूर्ण झाल्याचे दिसते तर सार्वजनिक बांधकाम खाते काम आद्यप पूर्ण नसल्याचा दावा करतेय. 

बोर्लीपंचतन भागात नागरिकांच्या मागणीनुसार काही ठिकाणी गतिरोधक बसवण्याचे काम बाकी आहे. आद्यप कंत्राटदाराचे काम बाकी आहे  मात्र सर्व ठिकाणी पांढरे पट्टे व आवश्यक ठिकाणी गतिरोधक लवकरच बसवू. 

असे असतात  गतिरोधक- 
सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार ३.६ मीटर म्हणजेच १२ ते १४ फूट रुंद असलेल्या या गतिरोधकाची मधली उंची ६ ते ८ इंच इतकी आहे. मात्र दोन्ही बाजूंनी निमुळता असलेल्या या गतिरोधकाची उंची अधिक असली तरी त्याप्रमाणात रुंदी असल्यामुळे वाहने आपटत नाहीत. वाहनांचा वेग मर्यादित असेल तर वाहनचालकांना या गतिरोधकामुळे कोणताही त्रास होत नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test