Type Here to Get Search Results !

श्री संत गोरोबा काकांचा संदेश विश्वाला प्रेरणादाई - नंदुशेठ गोविलकर


श्री संत गोरोबा काकांचा संदेश विश्वाला प्रेरणादाई - नंदुशेठ गोविलकर 

रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा 

म्हसळा तालुका कुंभार समाजाचे विद्यमाने श्री संत गोरोबा काका म्हसळा यांची ७०६ वी पुण्यतिथी कुंभार समाज सामाजिक समाजगृहात संपन्न झाली. या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचीत्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुंभार समाजाचे अध्यक्ष नंदकुमार गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी मनोगत व्यक्त करताना श्री संत गोरोबा काका यांचा संदेश विश्वाला प्रेरणा देणारा असल्याचे सांगीतले. कार्य क्रमात समाजातील लहानथोर मंडळी सहभागी झाली होती.शहरातील बहुतांश समाजाची मंडली या कार्यक्रमांत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.तालुक्यात कुंभार समाज अल्प प्रमाणात असला तरी समाजाची उत्तम प्रकारे एकी आहे.एकीमुळे शासकीय अगर सामाजिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला जातो.संत गोरोबा काका हे केवळ संत नसून ते कुंभार समाजाचे दैवत असल्याची प्रतिक्रिया समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी समाज अध्यक्ष नंदूशेठ गोविलकर यांच्यासह माजी अध्यक्ष सुनिल अंजर्लेकर,गजानन नारायण चेऊलकर,उपाध्यक्ष संतोष कुडेकर, हरीचंद्र गोविलकर,सचिव सुजित बोरकर,श्रीवर्धन -म्हसळा तालुका कुंभार समाज युवा अध्यक्ष अभय कळमकर, सेवक प्रदिप कदम,मंगेश बोरकर,धोंडिबाई बिरवाडकर,भाई बोरकर,महिला मंडळ अध्यक्ष वासंती म्हशीलकर,उपाध्यक्षा शालिनी गोविलकर,दिनेश म्हशीलकर,मंगेश देवे,उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के,प्रसाद पोतदार,नगरपंचायत गटनेते संजय कर्णिक,योगेश करडे,महेंद्र ढवळे, संतोष (नाना)सावंत, गणेश हेंगीष्टे,नंदकुमार हरिछंद्र गोविलकर,अरुण बिरवाडकर,महिला मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test