Type Here to Get Search Results !

प्रस्थापितांच्या विरोधात लढताना संघर्षतर करावाच लागेल - शिवसेना शहरप्रमुख दिनेश पाटील, पेण तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


प्रस्थापितांच्या विरोधात लढताना संघर्षतर करावाच लागेल - शिवसेना शहरप्रमुख दिनेश पाटील

पेण तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश 

युवक वर्गाच्या रोजगारासाठी लवकर रोजगार मेळाव्याचे आयोजन!

रायगड वेध प्रशांत पोतदार पेण 

शिवसेनेचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होत शिंदे गट शिवसेनेत पेण तालुक्यातील युवा वर्ग पक्ष प्रवेश करत आहेत आज ता.१८ मंगळवार रोजी पेण शहरातील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात डोलवी व शिवाजीनगर रामवाडी
विभागातील युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना वाढवण्यासाठी आपल्याला आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असून आजची राजकीय परिस्थिती वेगळी असली तरी आपण सत्तेत असणार आहोत त्यामुळे न डगमगता शिवसेनेसाठी काम करायचे आहे.शिवसेनेची पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी आहे. प्रस्थापितांच्या विरोधात लढताना संघर्ष करावा लागणार असल्याचे पेण शहर प्रमुख दिनेश पाटील यांनी सांगितले.

युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी सांगितल्याप्रमाणे युवा वर्गाच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे युवा वर्गासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.युवांच्या नोकरीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत तसेच युवकांनी नोकरी बरोबरच उद्योगधंद्यासाठी ही प्रयत्न करावे यासाठी लागणारे सहकार्य आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कडून करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे पेण युवा तालुका प्रमूख योगेश पाटील व पदाधिकारी यांच्या विशेष प्रयत्नाने युवावर्गाने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या सर्वांचे शिवसेनेत पक्ष प्रवेश करून घेण्यात आले.

प्रसंगी जिल्हा समन्वय बाळाशेठ म्हात्रे, युवा सेना जिल्हाप्रमूख संजयभाई म्हात्रे,  उपजिल्हाप्रमुख रुपेश पाटील,तालुका प्रमुख तुषार मानकवळे,शहर प्रमुख दिनेश पाटील ,तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकळ
शिवसेनेचे उद्भव कुथे,युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील, विभाग प्रमुख चंद्रकांत पाटील
विभाग प्रमुख नंदकुमार पाटील,विभाग प्रमुख प्रमोद पाटील,विभाग प्रमुख विलास कोळी, 
महिला आघाडी पेण तालुका महिला संघटिका प्रिती कुथे,शहर प्रमुख वंदना पाशिलकर,अंजलीताई जोगळेकर,प्रतिभा ठाकूर,अश्विनी ठाकूर,सरिता पाटिल 
सुषमा वारघे प्रणित कार्लैकर,नितिकेश पाटील,अनिकेत बैकर,कल्पेश बैकार,प्रतीक बैकर,पंकज पाटील,मयुरेश बैकर,रोहन म्हात्रे, चेतन तनपुरे,आदी पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थीत होते.
महेश नागे,किशोर मोहिते,संतोष बनसोडे,
बिपीन पाटील,यश मोहिते,सचिन पिलोलकर 
भावेश म्हात्रे,शंकर यादव,आंनद धोत्रे,अंकुश धोत्रे,विकास धोत्रे,अविनाश पवार,रवी जाधव,दर्शन नागे,दिपक चव्हाण,अमित सुतारअतिष विटकर आदी युवकांनी पक्ष प्रवेश केला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test