आमदार महेद्र थोरवे यांच्या बेताल वक्तव्याचा श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहिर निषेध - तालुका अध्यक्ष दर्शन विचारे
रायगड वेध अमोल चांदोरकर बोर्ली पंचतन
श्रीवर्धन मतदार संघाच्या कार्यतत्पर आमदार अदिती तटकरे यांना एकेरी शब्द वापरणारे कर्जत खालापूरचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अपशब्द वापरल्यामुळेच थोरवे यांचा जाहीर निषेध करण्यासाठी श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी दिवेआगर येथे लालाभाई जोशी यांच्या येथे पत्रकार परिषद आयोजित केली असता त्यावेळी पत्रकार परिषदेला तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, उपअध्यक्ष सुचीन किर, माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, माजी सभापती लाला भाई जोशी, माजी सरपंच उदय बापट, तालुका युवक अध्यक्ष सिद्धेश कोसबे,ज्येष्ठ नेते बबन सुर्वे, महीला शहर अध्यक्ष राजश्री मुरकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी बोलताना तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी सांगितले की आमदार महेंद्र थोरवे जासास तस उत्तर दिला जाणार असल्याची भुमिका तालुका अध्यक्ष यांनी मांडळी या वेळी ज्येष्ठ नेते बबनराव सुर्वे यांनी परखड मत व्यक्त करताना सांगीतले की आमदार अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन मतदार संघाचा प्रतिनिधित्व करत आहेत.यामुळे आमदार अदिती ताईंना राजकीय सामजिक सांस्कृतिक हा बाळ कडू आदरणीय खासदार सुनील तटकरे यांच्या कडून मिळाला असल्याने आदराची भूमिका त्यांच्या कडे आहे.मात्र महेंद्र थोरवे यांना आमदारकीची अचानक लागलेली लॉटरी त्या मुळे भाषा कुठे कशी वापरायची हे थोरवे यांना अद्याप कळत नाही त्यांनी बोललेले शब्द मागे घ्यावे.तर युवक अध्यक्ष सिद्धेश कोसबे यांनी भूमिका मांडतना सांगितले की आमदार थोरवे यांनी केलेले वक्तव्य त्वरीत मागे घावे अन्यथा रस्त्यावर उतरून थोरवे यांच्या पुतळ्याचा दहन करणार असल्याचे सांगितले.