नाईक व अंतुले महाविद्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य एम.एस.जाधव यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या तसेच ज्येष्ठ चरित्रकार धनंजय कीर,वसंत मून, अर्थतज्ज्ञ डाॅ.भालचंद्र मुणगेकर व अनेक लेखकांनी लिहिलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र साहित्याची,अनेक ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याप्रसंगी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक विचारांची मांडणी करताना इतिहास विभाग प्रमुख डाॅ.एस.यू.बेंद्रे यांनी बाबासाहेबांचा जीवन प्रवास, घटना निर्मितीची सामाजिक सर्वंकषता,आंबेडकरांची जलनीती, अर्थनीती,शेतकऱ्यांविषयी बाबासाहेबांचे विचार इत्यादी अनेक विषयांवर प्रकाश टाकाला. प्रा.आर.एस.माशाळे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक व बहिष्कृत भारत या नियतकालिकांचा उल्लेख करत बाबासाहेबांचे वैचारिक लेखन आजही समाजोपयोगी आहेत असे सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डी.ए.टेकळे,प्रा.एस.सी.समेळ, प्रा.सुमित चव्हाण,प्रा.राजेंद्र हालोर,महेंद्र करडे,वनिता समेळ, ॠत्विक बोरकर,अनिल बुधकर उपस्थित होते.