माजी पं.स.सभापती सदानंद गायकर यांच्या हस्ते पाटणसई येथील अंबा नदी किनारी बांधलेल्या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन
रायगड वेध अनिल पवार नागोठणे
नागोठण्याजवळील पाटणसई ग्रामपंचायतीकडून १५ व्या वित्त आयोग ग्रामपंचायत स्तरातील उपलब्ध निधीतून अंबा नदी किनारी वाकण पाली मार्गावर पाटणसई गावाच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन पाटणसई ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक असेलेले रोहा पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विभागीय नेते सदानंद गायकर यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. अशाप्रकारेच लोकाभिमुख कामे होत असून पाटणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत माजी पंचायत समिती सभापती सदानंद गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध बाबतीत विकास कामांचा झंजावात सुरु असल्याचे दिसून येत आहे.
गणपती विसर्जन घाटाच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर ठमके, पाटणसई ग्रामपंचायतीच्या सरपंच माधवी सदानंद गायकर, उपसरपंच सुरेश गायकर, माजी उपसरपंच पांडुरंग गायकर, सदस्य सचिनशेठ कळसकर, लिंबाजी पिंगळे, दीपक महाडिक, ऐश्वर्या अशोक कोतवाल, कुमारी यामिनी अनंत कोतवाल, हेमंत गायकर, मदन गायकर,विजय गायकर, शिवसेना(ठाकरे गट) शाखाप्रमुख छबिलदास कोतवाल, अनंत कोतवाल, शशिकांत गायकर, बाळकृष्ण देवरे, ताया वारगुडे आदींसह ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
पाटणसई ग्रामपंचायतीकडून नव्याने बांधण्यात आलेल्या या गणपती विसर्जन घाटामुळे गणेशोत्सव काळात बापांच्या विसर्जनाच्या वेळी खूप महत्वपूर्ण उपयोग होणार असून गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पांना चांगल्या पद्धतीने निरोप द्यायला मिळणार असल्याने पाटणसई ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.