दिवेआगर ग्रामपंचायतीकडून दिव्यांगाना अर्थसाहाय्य.
रायगड वेध अमोल चांदोरकर बोर्ली पंचतन
दिवेआगर ग्रामपंचायत यांच्या वतीने दिव्यांगाना दिव्यांग अर्थसाहाय्य निधीमधून धनादेशाचे वाटप करण्यात आले.
या वेळी तब्बल 27 दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 5595 एवढ्या रकमेचे धनादेश वाटप दिवेआगर ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले.मागील चार वर्षांपासून दिवेआगर ग्रामपंचायत यांच्या वतीने दीव्यांग व्यक्तींना धनादेशाचे वाटप केले जात आहे. तसेच अशाच प्रकारचे विविध उपक्रम दिव्यांग सबलीकरणासाठी दिवेआगर ग्रामपंचायत राबवत असते.या प्रसंगी या कार्यक्रमासाठी दिवेआगर ग्रामपंचायत सरपंच सिध्देश कोसबे, ग्रामसेवक शंकर गाणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष देवेंद्र नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य राकेश केळसकर, सदस्या नेहा पाटील ,तृप्ती चोगले, श्रुती कोसबे, मोहिता कोसबे यादी मान्यवर उपस्थित होते.