Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांची रायगड भेट


अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांची रायगड भेट

रायगड वेध संतोष शिलकर वेळास 

महाराजांच्या सागरी आरमारातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी व दौलत खान यांना अलिबाग येथील थळच्या समुद्रातील खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले महाराजांच्या आदेशां नुसार १६७९ साली आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांनी प्रचंड पराक्रम करून तोवर आरमारी युध्दात अपराजित असलेल्या इंग्रज आरमाराचा सपशेल पराभव सन १९ सप्टेंबर १६७९ रोजी केला होता.त्या नंतरही हल्ले होतच होते.परंतू शत्रूंवर विजय मिळविलाच व खांदेरी किल्ला बांधून पूर्ण झाला होता.आरमाराचा हा विजय दिन हिंदुस्थानी इतिहासातील गौरवशाली विजय होता.कारण इंग्रजांना आरमाचा शेकडो वर्षांचा अनुभव होता.परंतु अवघ्या २० वर्ष अनुभव असलेला नवख्या शिवआरमाराने हा विजय मिळविला होता.हि रोमहर्षक आणि गौरवशाली गोष्ट आहे.या साठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन आणि मायनाक भंडारी व दौलत खान आणि बहुजन समाजातील नौसेना वीरांचा हा पराक्रम सुवर्ण अक्षरात लिहला जावा असाच आहे. हा विजय दिन कोरोनाचा काळ वगळता गेले काही वर्षे त्या पराक्रमाचे स्मरण म्हणून विजय दिन साजरा केला जातो.तो रत्नदुर्ग किल्ल्यावर,रत्नागिरी तालुका भंडारी समाज अध्यक्ष व महासंघाचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजीव कीर यांच्या पुढाकाराने हा विजय दिन साजरा करत असतात.हा प्रताप,हा पराक्रम खांदेरी किल्लावर झाला आहे.आणि म्हणून हा विजय दिन रायगड जिल्ह्यात व्हावा याकरीता महासंघाचे पदाधिकारी शनिवार दि.१५/४/२०२३ रोजी खांदेरी किल्यावर जाऊन मायनाक भंडारी यांचा पराक्रम जाणून घेतला.प्रथम किल्यावर असलेल्या वेतोबाच्या मंदिरात जाऊन वेतोबाचे दर्शन घेतलं.तिथे असलेल्या पुजाऱ्याने त्याला माहीत असलेली माहीती सांगितली.मात्र इंग्रजां समोर ज्यांनी भिम पराक्रम केला,ज्यांनी हा किल्ला बांधला त्या महाराजांच्या शिलेदाराचं किल्यावर कुठेही नावाचा उल्लेख नाही.याची खंत अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांच्या समवेत कार्याध्यक्ष विनोद चव्हाण,मुख्य सचिव प्रकाश कांबळी,सचिव सुष्मिता तोडणकर,उपाध्यक्षा सुषमा मांजरेकर,उपाध्यक्ष अनिल नागवेकर,उपाध्यक्षा शलाका पांजरी,सदस्य शरद पांजरी,सहदेव सातर्डेकर,किशोर बागकर,प्रशांत पाटकर,सुदर्शन केरकर,मा.रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेंद्र विलणकर,नितीन तळेकर,सुरेश शेट्ये,मधुकर नागवेकर,उदय हतीसकर,रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सुधाकर पाटील यांनी दौऱ्याचे निटनेटके नियोजन केले.
माजी उपाध्यक्ष श्रीवर्धन-म्हसळा भंडारी समाज सेवा संघ,संतोष शिलकर,कित्ते भंडारी बहुउद्देशीय भंडारी समाज संघटना अध्यक्ष दर्शन पारकर यांच्या संघटनेच पदाधिकारी विलास आमरे,बळवंत शिरसेकर,संतोष मोरे व त्यांचे सहकार्य लाभले,हि मोहीम यशस्वी करण्यासाठी उद्योगपती,समाज बांधव राजन नार्वेकर यांनी विषेश मेहनत घेतली त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.असे जवळ पास पन्नास/पंचावन्न समाज बांधवांना बरोबर घेऊन परतले,त्यानंतर अलिबाग येथील कित्ये भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या सभागृहात आयोजित केलेल्या सभेत समाजाला मार्गदर्शन केले भंडारी समाजाचा इतिहास लपविला जातोय या साठी आवाज उठविणे गरजेचे असल्याचे सांगून पुढील कार्याची रुपरेषा सांगितली.प्रस्थावना जेष्ठ समाज बांधव तोडणकर गुरुजी यांनी केले.दुसऱ्या दिवशी श्रीवर्धन तालुक्यात पदार्पण करतांना वेळास,वडवली, बोर्ली-पंचतन, दिवेआगर, शेखाडी, वाळवटी,निगडी काठी,गालसुरे,गालसुरे काठी अशा विविध गावच्या समाज बांधवांनी त्यांचा व त्यांच्या समवेत असलेल्या समाज बांधवांचा उत्स्फुर्त स्वागत करून सत्कार केला.दिवेआगर येथील समाजाने त्यांच्या भोजनाची व्यवस्था यथोचित सांभाळली,बागमांडला-हरिहरेश्वर येथे भंडारी चषक क्रिकेट लीग येथे मार्गस्थ होतांना समाजाने या सर्व मंडळींचा स्वागत करून सत्कार केला.विश्वस्थ विठोबा आप्पा देवकर यांच्या निवास्थानी चहा पान झाला.स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन त्या सर्व भंडारी बांधव खेळाडू आणि आयोजक या सर्वांचे मनोधेर्य वाढविले,युवा खेळाडूंना सल्ला दिला.युवा खेळाडू उदयास यावेत या साठी कोकणातील विविध जिल्ह्यातुन दोन दोन संघ घेऊन भंडारी चषक टूर्नामेंट एका स्टेडियमला डे-नाईट स्पर्धेचं आयोजन करू असं सांगितलं,सर्व जण दोन दिवसांची सदिच्छा भेट देऊन मुंबईकडे रवाना झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test