विद्या घरत आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
रायगड वेध प्रशांत पोतदार पेण
पेण एज्युकेशन सोसायटीच्या वावोशी येथील शाळेत गेली २५ वर्ष विद्या ज्ञानाचे पवित्र काम करणा-या सौ. विद्या धनाजी घरत यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन बापूसाहेब नेने फाऊंडेशन च्या वतीने शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व मानपत्र रोख २५०० रूपये देऊन आदर्श शिक्षिका पुरस्काराने समाजसेविका सौ.शुभांगी नेने यांच्या हस्ते करण्यात आला.
समाजसेविका सौ.शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बापूसाहेब नेने फाऊंडेशन तर्फे आदर्श शिक्षकांचा गौरव तसेच सोबती संस्थेतर्फे समाजातील विविध क्षेत्रातील नामवंतांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा मित्र मंडळ काॅलेज पूणे येथील संस्थापक सदस्य श्रीकांत कल्लूरकर सोबती संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब नेने पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा बापूसाहेब नेने फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड मंगेश नेने फाऊंडेशनच्या सचिव अँड निता कदम संस्थेचे सचिव सुधीर जोशी शुभांगी नेने संस्थेचे माजी कार्याध्यक्ष वसंत आठवले पेण नपाच्या माजी उपनगराध्यक्षा वैशाली कडू आदीसह विविध मान्ययव उपस्थित होते.
यावेळी विद्या घरत यांनी गेल्या २५ वर्षात केलेल्या विविध शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण स्वच्छता अभियान यासह शैक्षणिक साहित्य वाटप करणे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा विविध गुणदर्शन कार्यक्रम आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम शैक्षणिक सहलीतून पर्यावरण विकास विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेत प्रोत्साहित करणे शालेय विद्यार्थ्यांचा पट वाढण्यासाठी विविध गावात फिरून विद्यार्थी गोळा करून त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करणे चित्रकला व रांगोळी स्पर्धेत यश संपादन करणे शाळा सर्वांग सुंदर व्हावी यासाठी २५ वर्षे केलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित केले.पुरस्काराबद्दल संस्थाचालक सर्व संचालक वावोशी व पेण शाळेतील शिक्षक बंधू भगिनी तसेत रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा संघटनेचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी व शिक्षकांनी मला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देऊन माझे अभिनंदन केले.