दिवेआगर गाव विकास समितीच्या अध्यक्षपदी विजय तोडणकर यांची निवड
स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना सुगीचे दिवस येणार ?
रायगड वेध अभिजीत मुकादम
नुकत्याच झालेल्या दिवेआगर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावाच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नावर म्हणजेच पुणे - मुंबई येथील व्यावसायिकाकडुन दिवेआगरची ओळख आणि वैभव असलेल्या नारळ सुपारीच्या बागांची बेसुमार तोड करुन होत असलेल्या प्रचंड प्रमाणातील बांधकामांना आळा घालण्याकरीता विजय तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली दिवेआगर गाव विकास कमिटी नेमण्याचा ठराव उपसरपंच वासिम फगजी यांनी मांडला. सदरच्या ठरावास सरपंच श्री.सिद्धेश कोसबे यांच्यासहीत उपस्थित सर्वच ग्रामस्थांनी अनुमोदन दिले.
विजय तोडणकर यांच्या ह्या महत्वपूर्ण निवडीने स्थानिक दिवेआगर व्यावसायिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
दिवेआगर गावच्या विकासासाठी आपल्या कमिटीतील सर्व सदस्यांना व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांना सोबत घेऊन बाहेरील व्यावसायिकांकडून होत असलेल्या अवाढव्य बांधकामांना व बांधकामाकरीता नारळी पोफळीच्या बागांच्या -हासाला निश्चितच आवर घालण्यात मी यशस्वी ठरेन व गावातील स्थानिक व्यावसायिकांना यामुळे निश्चितच मोठा दिलासा मिळवून देण्यात मी जराही तडजोड करणार नाही.ह्या बाबतीत माझ्या दिवेआगर ग्रामस्थाना व मा.सरपंच व मा.उपसरपंच यांना माझ्यावर पुरेपूर विश्वास असल्यानेच त्यांनी ह्या महत्वपूर्ण पदासाठी माझी निवड केली असणार असे विजय तोडणकर यांनी यावेळी सांगितले .
विजय तोडणकर यांच्या गाव विकास समितीच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांचे सर्व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.