Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील ६० हजार गिरणी कामगारांचा मुंबईत महामेळाव्याचे आयोजन, गिरणी कामगारांच्या हक्कासाठी अलिबाग तालुक्यातील गिरणी कामगारांचा जाहीर मेळावा


महाराष्ट्रातील ६० हजार गिरणी कामगारांचा मुंबईत महामेळाव्याचे आयोजन 

*गिरणी कामगारांच्या हक्कासाठी अलिबाग तालुक्यातील गिरणी कामगारांचा जाहीर मेळावा 

*मिल कामगारांना मुंबईत हक्काची घर मिळालीच पाहिजे ; *मिल कामगारांना जिल्हा प्रमूख राजाभाई केणी यांचा पाठिंबा.

सदनिका द्या नाहीतर त्याला मिळणारा योग्य भाव तरी वारसांना मिळालाच पाहिजे - जिल्हाप्रमुख राजाभाई केणी 

आयुष्यात गिरणी कामगर तुम्हाला विसरणार नाही -गिरणी कामगार अध्यक्ष आनंद मोरे

अनेक वर्षापासून गिरणी कामगारांचे प्रश्न उभे आहे ते सुटले पहिजे - सेक्रेटरी हेमंत गोसावी 

रायगड वेध प्रशांत पोतदार पेण 

मुंबई विकास नियमावलीत बदल करून गिरणी कामगारांच्या हक्काची ८५ टक्के जमीन मालकांच्या घशात घालण्यात आली, गिरणी कामगारांच्या संघटनेत फूट पडल्या यामुळे गिरणी कामगार गावाला आला,गिरणी कामगार मुंबईची शान होती.

या मुंबईच्या माणसाला काही राजकीय लोकांनी व्ही आर एस घ्यायला लावले, महाराष्ट्राच्या शिंदे व फडणवीस सरकारमध्ये आता या गिरणी कामगाराच्या प्रश्नाबाबत आवाज उठवला आहे न्याय हक्कासाठी होणारा महामेळावा हा भूतोन भविष्यती असा झाला पाहिजे, सरकारला आता जाग आली पाहिजे सरकारने गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घर दिली पाहिजे किंव्हा जी आर प्रमाणे मिळणाऱ्या सदनिकांचे भाव गिरणी कामगारांना व वारसांना मिळालाच पाहिजे असे ठाम मत यावेळी शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी केले.

मुंबईतील गिरणी मालकांनी गिरणी कामगारांच्या जागा विकल्या त्या गिरणी कामगारांना हक्काची घर मिळालीच पाहिजे या हेतूने गिरणी कामगाराच्या हक्कासाठी अलिबाग तालुक्यातील गिरणी कामगारांच्या वारसांच्या हक्काच्या घरासाठी गिरणी कामगारांचा जाहीर मेळाव्याचे आयोजन कुसुंबळे येथे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आले होते.
यावेळी गिरणी कामगार वारस संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या सरकार मध्ये गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, गिरणी कामागर आता थकला आहे जर आता २०२३ गिरणी कामगारांना घर मिळाली तर आयुष्यात गिरणी कामगर तुम्हाला विसरणार नाही तर येणाऱ्या निवडणूकीत कोणाला मतदान करणार हे ते ठरवतील असे ही त्यांनी सांगीतले.होणाऱ्या महामेळाव्याला मोठ्या संख्येत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी उपस्थीत राहायचे असल्याचे त्यांनी सांगितले 
तर यावेळी सेक्रेटरी हेमंत गोसावी यांनी गिरणी कामगार हा अस्मितेचा प्रश्न उभ्या महाराष्ट्रा बरोबर इतर देशात गिरणी कामगारांच्या प्रश्नाची चर्चा होत आहे.गिरणी कामगारांच्या नोकऱ्या जावून आज ३० वर्ष झाले आहेत आज हि गिरणी कामगार संघर्ष करत आहे.१९८२मध्ये बिकट परिस्थती निर्माण झाली. मुंबईत ५८ मिल होत्या या गिरण्यात महाराष्ट्रातून कामगार काम करण्यासाठी येत होते.१९९१ साला पासुन गिरण्या बंद झाल्या.कामगारांना घर मिळण्या साठी ५ संघटना एकत्र आल्या आहेत तसेच आजवर अनेक संघटना गिरणी कामगरांच्या जूनच्या अधिवेशना पर्यंत गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सुटला पाहिजे आझाद मैदानात सरकारचे आभार मानू नहीतर आमरण उपोषण पुकारण्यात येईल असा सेक्रेटरी हेमंत गोसावी यांनी इशारा दिला.
यावेळी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी गिरणी कामगार वारस संघर्ष समिती अध्यक्ष आनंद मोरे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील,बाबा कदम,सेक्रेटरी हेमंत गोसावी, अप्पा पिंगळे,अरविंद पाटील,सूर्यकांत पाटील,
कमळाकर पाटील,महेश वावेकर,विकास कोटेकर,सूर्यकांत पाटील, प्रमिला कमळाकर पाटील, उत्तम पाटील,मोहन पाटील, जीवन पाटील तसेच मोठ्या संख्येत अलिबाग तालुक्यातील गिरणी कामगार व वारस उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test