Type Here to Get Search Results !

श्रीवर्धन तालुक्यातील भूमिहीन शेतमजुरांना चार एकर जिरायत जमीन किंवा दोन एकर बागायत जमीन मिळणार.


श्रीवर्धन तालुक्यातील भूमिहीन शेतमजुरांना चार एकर जिरायत जमीन किंवा दोन एकर बागायत जमीन मिळणार.

रायगड वेध वैभव तोडणकर आदगाव 

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली एक एप्रिल 2023 ते 01 मे 2023 या समता पर्व अभियाना अंतर्गत जनतेशी थेट संवाद साधून शासनाच्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी कार्यशाळा तालुकास्तरीय अध्यक्ष प्रांताधिकारी यांच्या श्रीवर्धन येथील प्रशासन कार्यालयात घेण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव तहसीलदार महेंद्र वाकलेकर,नायब तहसीलदार प्रथमेश भुरके, रत्नदीप केमनाईक, समाज कल्याण निरीक्षक मंदाकिनी कांबळे पाटील, माधुरी पाटील तसेच प्रमुख वक्ता म्हणून गोपाळ तंतरपाळे तसेच उमेश लांगी, अनिल कडू व तालुक्यातून आलेल्या आलेल्या माता भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली असलेल्या अनुसूचित जाती वर्गातील भूमिहीन शेतमजुरांना चार एकर कोरडवाहू जिरायत किंवा दोन एकर बागायत जमीन उपलब्ध करून अशा भूमिहीन शेतमजुरांना स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेला आहे. त्यानुसार ही जागा उपलब्ध करण्याचे काम प्रांत स्तरावरील समिती तसेच जिल्हास्तरीय समिती करणार आहे.
या योजनेच्या पात्रतेसाठी जातीचा दाखला भूमिहीन शेतमजूर असलेचा दाखला तसेच दारिद्र्यरेषेखालील दाखला आवश्यक आहे तसेच विधवा व परित्यक्त स्त्रीला या योजने मध्ये प्राधान्य असणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता असलेले गोपाळ तंतरपाळे यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजना माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी त्यांच्या कारकिर्दीत कशाप्रकारे सुरुवात केली तसेच ज्यांचं नाव या योजनेला देण्यात आलं त्या दादासाहेब गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहून आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात कशाप्रकारे कार्य केलं होतं याची माहिती व्यवस्थितपणे अत्यंत सोप्या भाषेत सर्वांना सांगितली.
यावेळी नायब तहसीलदार यांनी या योजनेअंतर्गत लाभार्थींना जे दाखले महसूल विभागाकडून लागणार आहेत ते त्वरित उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुणोदय सुशिक्षित बेरोज़गार सहकारी संस्था खरसई यांच्यामार्फत तरुण होतकरू मुलांनी पथनाट्य सादर करून त्या माध्यमाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ( P.M.M.S.Y),कोळंबी प्रकल्प,मत्स संवर्धन प्रकल्प, गरिबांची लेक लाडकी योजना समजून सांगितले तसेच दारू सिगारेट तसेच मोबाईल ची व्यसनमुक्ती करण्याबाबत सामाजिक संदेश दिला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test