Type Here to Get Search Results !

ई "कोर्ट व "ई "फायलींग हेच आपले सर्वांचे भविष्य आहे, गेली ४० वर्ष श्रीवर्धन येथील न्यायिक अधिकारी व पक्षकार यांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेलं न्यायदानाचं काम वाखाण्याजोग आहे __ मिलिंद साठे उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती


"ई "कोर्ट व "ई "फायलींग हेच आपले सर्वांचे भविष्य आहे 

गेली ४० वर्ष श्रीवर्धन येथील न्यायिक अधिकारी व पक्षकार यांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेलं न्यायदानाचं काम वाखाण्याजोग आहे __ मिलिंद साठे उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती.

रायगड वेध वैभव तोडणकर आदगाव 

दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर श्रीवर्धन या न्यायालयाच्या प्रस्तावित नूतन इमारतीचा भूमीपूजन समारंभ उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती,जि.रायगड मिलिंद म.साठ्ये यांच्या हस्ते व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग शैलजा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि.23) संपन्न झाला. यावेळी न्यायमूर्ती मिलिंद साठे यांनी गेली 40 वर्ष आधी चाळीमध्ये व नंतर भाड्याच्या इमारतीमध्ये अनेक गैरसोयी मध्ये राहुन न्यायदानाचे काम योग्य रीतीने केल्याबद्दल न्यायिक अधिकारी व पक्षकारांचे विशेष कौतुक केले. तसेच भविष्यात इ कोर्ट व ई फाइलिंग हा न्यायव्यवस्थेचा कायमचा भाग होणार असून त्याच्या सोबत भविष्यात सर्वांनी जुळवून घ्यावे लागेल असा मोलाचा सल्लाही उपस्थित न्यायाधीश व वकील यांना त्यांनी दिला.

आजच्या कार्यक्रमाला आमदार अदिती तटकरे, रायगड जिल्हा अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्रांताधिकारी अमित शेडगे, जिल्ह्यातील न्यायाधीश व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविकात श्रीवर्धन वकील संघटनेचे अध्यक्ष आशिष वढावकर यांनी खासदार सुनील तटकरे यांनी 2010 साली अर्थमंत्री असताना न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा व आमदार आदिती तटकरे यांनी विधी व न्याय मंत्री असताना इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे या सर्व कामात महत्त्वपूर्ण भूमिका कशी बजावली, याची सविस्तर माहिती देऊन दोघांचेही जाहीर आभार मानले.

 गेल्या सुमारे 40 ते 45 वर्षे श्रीवर्धन न्यायालयाची स्वतंत्र वास्तू उभारण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न सुरू होते. दि.26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून श्रीवर्धन येथे न्यायालयाची इमारत व न्यायाधीशांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार तळमजला अधिक दोन मजले अशी 3512.80 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची न्यायालयाची इमारत बांधण्यात येणार आहे.

या नियोजित वास्तु मध्ये दोन कोर्ट असतील तर दोन न्यायाधीश व कर्मचायास राहण्यासही निवासाची व्यवस्था असून वकिलांसाठी बार रूम असतील अशी 37 हजार चौ. फूटा हून अघिक अशी सुसज्ज वास्तु 24महिन्यात उभी राहील अशी माहिती जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत यांनी उपस्थितांना दिली तर तर श्रीवर्धनच्या न्यायाधीश श्रीमती सोनाली जवळगेकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test