कोणी हरला नाही कोणी जिंकला नाही, जिंकली ती नागलोली सातगाव पंचक्रोशी
नागलोली सातगाव पंचक्रोशी क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट प्रीमिअर लीग २०२३ नालासोपारा येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
रायगड वेध अमोल चांदोरकर बोर्ली पंचतन
९ एप्रिल रोजी नालासोपारा येथे नागलोली सातगाव पंचक्रोशी क्रीडा मंडळ तर्फे प्रीमिअर लीग चे आयोजन केले होते या लीग चे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या लीग मध्ये आपल्या गावासाठी न खेळता आपल्या पंचक्रोशी साठी एकत्रित येऊन खेळत होते पंचक्रोशी मधील सर्व तरुण मंडळी नी गाव,वाडी, पक्ष, बाजूला ठेऊन प्रीमिअर लीग यशस्वी केली हे विशेष, प्रीमिअर लीग मध्ये 8 संघमालकांनी आणि 130 खेळाडूनीं सहभाग घेतला होता सर्व पंचक्रोशीतील मंडळी कडून या लीग चे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे
या प्रीमिअर लीग चे महत्वाचे उदिस्ट म्हणजे पंचक्रोशी मधील तरुण संघटित व्हावा, सर्वांची ओळख निर्माण व्हावी, पंचक्रोशी मधील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देणे होता... प्रीमिअर लीग सर्व खेळीमेळीच्या वातावरनात पार पडली.. सर्व खेळाडूंनी एकत्रित येऊन ज्या उत्सहात पार पाडली त्यामुळे एकच बोलता येईल.. यात कोणी हरला नाही कोणी जिंकला नाही जिंकली ती सर्वांची मन, जिंकली ती पंचक्रोशी मधील तरुण मंडळी, जिंकली ती नागलोली सातगाव पंचक्रोशी
नागलोली सातगाव पंचक्रोशी क्रीडा मंडळ आयोजित प्रीमिअर लीग 2023 नालासोपारा येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
विजयी संघ पुढील प्रमाणे
1) संघमालक - श्री मनोज पाटील - मराठा वॉरियर्स प्रथम क्रमांक
2) संघमालक - श्री सुंदर गिजे - यंग स्टार 11 दुतीय क्रमांक
3) संघमालक - श्री विकास सखाराम खांडेकर - राम 11 तृतीय क्रमांक
4) संघमालक - श्री अजित सोलकर श्री तुकाराम आवेरे - चौथा क्रमांक
नागलोली सातगाव पंचक्रोशी क्रीडा मंडळ कमीटी
अध्यक्ष श्री रोशन दिनेश महाडिक
उपाध्यक्ष श्री मिलिंद रायगवळी
सेक्रेटरी श्री मनोज मोहन पाटील
उप सेक्रेटरी श्री सुंदर हरिचंद्र गिजे
खजिनदार श्री सागर शांताराम सोलकर
सह खजिनदार श्री अल्केश गोविंद रसाळ
सल्लागार श्री भालचंद्र सुदाम रसाळ, श्री योगेश जाधव, श्री सुनिल विठोबा रिकामे, श्री सचिन शशिकांत पाटील
सदस्य आकाश महाडिक, किरण गायकर राकेश गिजे, सुभाष रसाळ, सज्जन धनावडे, भरत सोलकर, सोहिल कांबळे