नागोठण्यात चाळीस गाव वारकरी संप्रदायाच्या वतीने चौथ्या किर्तन महोत्सवाचे आयोजन
रायगड वेध अनिल पवार नागोठणे
नागोठणे विभागातील चाळीस गावांचा सहभाग असलेल्या चौथ्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन चाळीस गाव वारकरी सांप्रदाय नागोठणे विभागाच्या वतीने येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर व नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिरासमोरील प्रांगणात रविवार दि. २ एप्रिल ते सोमवार दि. ३ एप्रिल या दोन दिवशी करण्यात आले आहे. यावेळी या चाळीस गाव वारकरी संप्रदाय किर्तन महोत्सवानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथातील नवव्य व बाराव्या अध्यायाचे पारायण होणार असून हरिपाठ तसेच प्रसिद्ध किर्तनकार यांचे किर्तन सुश्राव्य होणार आहे. त्यामुळे विविध व भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आलेला हा भव्य किर्तन महोत्सव सोहळा नागोठण्यात रंगणार आहे.
या किर्तन महोत्सवात अखंड हरिनाम, पारायण, हरिपाठ, भजन, कीर्तन, जागरण यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रविवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ९ वा. दरम्यान अकोले(विदर्भ) येथील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प विजय महाराज गवळी शास्री यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. तर सोमवार दि.३ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ वा. दरम्यान खोपोली येथील प्रसिद्ध किर्तनकार, रायगड भुषण पुरस्कार प्राप्त ह.भ.प रामदास महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या नवव्या व बाराव्या अध्यायाचे पारायण होणार आहे. या किर्तन महोत्सवासाठी नागोठणे विभागातील चाळीस गावांतील अनेक दानशुर व्यक्तींनी विविध माध्यमातून सढळ हस्ते व भरभरुन मदत केलेली आहे. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी चाळीस गाव वारकरी सांप्रदाय नागोठणे विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.