Type Here to Get Search Results !

बोर्ली पंचतन - दिघी रस्त्यावर मोटरसायकल चा भिषण अपघात, दोघांचा मृत्यू

बोर्ली पंचतन - दिघी रस्त्यावर मोटरसायकल चा भिषण अपघात, दोघांचा मृत्यू


 रायगड वेध अभय पाटील बोर्ली पंचतन 

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बोर्लीपंचतन मार्गावर 29 मार्च 2023 रोजी रात्री 9 च्या सुमारास वेळास आणि वडवली गावच्या दरम्यान एस्सार पेट्रोलपंपा समोर वडवली गावातील रहिवासी आतिश महेश नाक्ती हे आपली होंडा कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MHO6 BR 8998 वेळास वरून बोर्लीच्या दिशेने येत असताना हा दुर्देवी अपघात झाला आहे. 

          याबाबत मिळालेल्या महितीनुसार दिनांक २९मार्च २०२३ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास वडवली गावातील आतिश महेश नाक्ती (वय-३०) राहणार वडवली हे मोटरसायकलवरून आणि इकबाल शरफुद्दिन गझगे (वय-५५) राहणार गोंडघर हे बोर्लीच्या दिशेने पायी चालत येताना त्यांना एस्सार पेट्रोल पंपा समोर मोटरसायकल स्वार आतिश महेश नाकती यांच्या मोटरसायकलची इगबल गझगे यांना जोरदार धडक लागली.हि धडक इतकी जोरदार होती की या धडकेत दोघेही गंभीर जखमी होऊन पडले, आतिश नाकती हे बेशुद्ध होते असे समजते. अपघात एवढा भिषण होता कि मोटार सायकलचा पुढचा भागाचा चक्काचूर झाला .या घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याची तातडीने घटनास्थळी पोहचून दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी बोर्ली पंचतन येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले.परंतु, उपचारापूर्वीच दुर्दैवाने आतिश महेश नाकती यांना मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 तर इकबाल शरफुद्दिन गझगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आले,पण दुर्दैवाने काही अंतरावर वाटेत पेण शहरा जवळ इकबाल शरफुद्दिन गझगे यांनी हि आपले प्राण सोडले. शवविच्छेदनासाठी इग्बाल शरफुद्दिन गझगे यांचा शव म्हसळा व आतिश महेश नाकती यांचा शव श्रीवर्धन रुग्णालयात पाठविण्यात येऊन व घटनेचा पंचनामा करून अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक डॉ.प्रसाद ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या घटनेने वडवली व गोंडघर गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

   दिघी माणगाव रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम वडवली फाटा ते वेळास गाव दरम्यान पूर्ण झाले असल्याने येथून चालणारी वाहने भरधाव असतात आणि या रस्त्यावर पादचारी चालत असेल किंवा म्हैस, बैल, किंवा अन्य प्राणी रस्त्यामध्ये असल्यास रात्रीच्या काळोखात दिसत नसल्याने असे जीवावर बेतणारे अपघात होत आहेत. या अशी देखील असे अपघात झाले आहेत यावर असे अपघातप्रवण क्षेत्र ठरवून तिथे उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

अपघातामध्ये मृत्यू पावलेला वडवली अतिष नाक्ती 30 वर्षाचा हरहुन्नरी तरुण हा बांधकाम व्यवसायामध्ये काम करीत होता, त्याने नुकतेच आपले नवीन घर बांधून काही दिवसांपूर्वीच नवीन घरामध्ये प्रवेश केला होता, अतिष हा समाजिक, क्रीडा, राजकारण यामध्ये नेहमीच पुढाकार घेत होता त्याच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test