पोलादपूर बस स्थानकामध्ये विद्यार्थी व कार्यकर्त्यांकडून एसटी प्रशासन विरोधी तीव्र आंदोलन.
रायगड वेध ऋषाली पवार लोहारे पोलादपूर
पोलादपूर बस स्थानकामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी कार्यकर्ते समाजसेवक यांच्याकडून एसटी प्रशासन विरोधी तीव्र आंदोलन करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालय ऑनलाईन पद्धतीने सुरू होते, परंतु आता शाळा महाविद्यालय पुन्हा ऑफलाइन सुरू झाले आहेत पोलादपूर शहरांमध्ये विद्यार्थी शिक्षणाकरिता खेडेगावातून येत असतात यासाठी एकमेव साधने एसटी बस आहे.
परसुले क्षेत्रपाल, खुडपण, गोळेगणी, तुटवली ही गावातील विद्यार्थी सकाळी सहा वाजता महाविद्यालयात येण्यासाठी घर सोडतात महाविद्यालय बारापर्यंत पूर्ण होत परंतु पुन्हा घरी जाण्यासाठी त्यांना सायंकाळपर्यंत वाट पहावी लागते. त्या बस मध्ये देखील क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरण्यात येत असल्यास आरोपही विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत आहे काही महिन्यात विद्यार्थ्यांसाठी गैरसोय होत आहे तरी देखील एसटी प्रशासन यावरती लक्ष देत नाही यामुळे संतप्त ग्रामस्थ विद्यार्थी यांनी सायंकाळी ४ वाजल्यापासून ६ वाजेपर्यंत लोकल एसटी कुठल्याच विभागात जाऊ दिली नाही. यावरती लवकरात लवकर तोडगा काढून एसटी प्रशासनाने पूर्वपथावर जशा गावोगावी एसटी जात होती त्यावेळी नुसार चालू करावी विद्यार्थी आणि तालुक्यातील समाजसेवक दीपक उत्तेकर व अन्य समाजसेवक व कार्यकर्त्यांनी मागणी केली.