Type Here to Get Search Results !

म्हसळ्यात गुलाबी थंडीत पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर, सूर्यही उगवतोय विलंबानेच


म्हसळ्यात गुलाबी थंडीत पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर, सूर्यही उगवतोय विलंबानेच


रायगड वेध संजय खांबेटे,म्हसळा 


सोमवार दिं ३ रोजी पहाटे म्हसळा शहर, बायपास्ट आणि गौळवाडी परीसर, सावर, खारगाव (बु) परिसरांत दाट धुक्याची चादर पसरली होती. बहुतांश याच परिसरांतील विविध मार्गावर पहाटे फिरायला  जाणाऱ्या -येणाऱ्यांची गर्दी मोठी असते.या दाट धुक्यामुळे सूर्यकिरणेही पृथ्वीवर उशिरानेच पोहोचली होती.मागील काही दिवसांत सकाळच्या वातावरणात गारठा वाढला असून आज पहाटे सर्वत्र शुभ्र धुके  पसले होते. नागरिकही या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.

नवरात्रांत दुर्गादेवी विविध रुपे घेते,त्याचप्रमाणे निर्सगही वेगवेगळी रुपे घेतो असे जाणकार नेहमीच सांगत असतात. सोमवारी पहाटेपासून ८ वाजे पर्यंत धुक्‍याची चादर पसरली होती, नंतर मात्र शहराचे तपमान वाढत होते, मध्यान्ही उन्हाचे चटके सहन होत नाही,सायं ४ते ७ यावेळी ढग जमतात कधी विजांच्या कडकडाटसह  पाऊस बरसतो नाहीतर परिसरांत अन्यत्र पडला तर  हवामानात गारवा येतो. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आगामी चार दिवस तपमानात चढ-उतार अनुभवास येणार आहे. हवामानाचा हा लहरीपणा आता आणखी काही दिवस नागरिकांना सोसावा लागणार आहे. या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरांत आणि तालुक्यांत खोकला, सर्दी व तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. असे असले तरी, अनेक महिन्यांनी अनुभवायला मिळालेल्या धुक्‍याचा आनंद नागरिकांना आल्हाददायकच वाटत आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test