दिघी सागरी पोलिसांची बेधडक कारवाईचे सत्र सुरूच; हातभट्टी दारु वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले
रायगड वेध श्रीकांत शेलार दांडगुरी
दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगलजेट्टी किनार्यावर गावठी हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्या वॅगनर गाडीसह सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी मात्र फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार १ऑक्टोबर रोजी वॅगनर गाडीतून (क्र. एमएच ४३ आर ७३९३) बेकायदेशीर गावठी हातभट्टी तयार दारू वाहतूक करत होता. पोलीस गाडीची चाहूल लागताच वाहनावरील चालक पळून गेला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
या कारवाईत ६ हजार रुपये किमतीची २० लिटर मापाची ३ काळया रंगाच्या रबरी ट्युबमध्ये गावठी हातभट्टीची तयार दारू १०० रुपये प्रति लिटर प्रमाणे २०० तसेच दोन लाख रुपये किमतीची एक सफेद रंगाची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर गाडी जप्त करण्यात आली. फिर्यादी पप्पू भगवान भंडलकर (वय ३३, पोलीस शिपाई ८६८) यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई करण्यात आली. यातील आरोपी फरार आहे. पुढील तपास स. पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक धर्मराज गावडे करत आहेत.