Type Here to Get Search Results !

चिंचवली ग्रा.प. सदस्य शैलेश महाडीक काँग्रेसचे सुरेश यादव यांचा समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश


आता गोरेगांव व चिंचवली ग्रामपंचायतीमध्ये पहरवर्तन घडावयाचे आहे- आ. भरत गोगावले

चिंचवली ग्रा.प. सदस्य शैलेश महाडीक काँग्रेसचे सुरेश यादव यांचा समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश


रायगड वेध गिरीश गोरेगावकर माणगाव 


   राज्यात सत्तांतर झाल्यापासून विकासकामांना एक वेगळीच गती प्राप्त होत आहे. वेगवेगळ्या गावातील ग्रामस्थ बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहेत. आज चिंचवली नवेनगर ग्रामस्थांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविला जाईलच, पण आता गोरेगांव व चिंचवली ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन करावयाचे असल्याचे प्रतिपादन आ. भारत गोगावले यांनी चिंचवली नवेनगर येथे केले.

चिंचवली नवेनगर येथील ग्रामस्थांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. योवळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, विभागप्रमुख जगदीश भोकरे, लोणेरे विभागप्रमुख रवि टेंबे, ॲड. राजेश लिमजे, युवा सेना जिल्हाधिकारी विपुल उभारे, युवा सेना अधिकारी शैलेश भोजने, श्री. हर्गे, शहरप्रमुख प्रदीप गोरेगांवकर, उपशहरप्रमुख नथुराम बामणोकर, गोरेगांव विभाग महिला संघटिका सौ. नंदिनी गावडे, गोरेगांव शहर महिला संघटिका सौ. अस्मिता आंबेतकर, माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुजित शिंदे, माजी जि. प. सदस्य सौ. अमृता हरवंडकर, माजी विभागप्रमुख मधूकर नाडकर, रामचंद्र मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कदम, श्री. पदरत, संजय गावडे, दिनेश हरवंडकर, जगदीश दोशी आदि उपस्थित होते.
आ. गोगावले यांनी यावेळी या भागाचा वनजमिनीचा प्रश्‍न असेल, पाणी प्रश्न असेल किंवा सोन्याच्या वाडीवरील रस्ता असेल, ही सर्व कामे येत्या काळात करण्याची ग्वाही देऊन, काहीजण म्हणतात भरत शेठ यांच्यामुळे आमचे मंत्रिपद गेले, पण तुमचे मंत्रिपद गेले ते तुमच्या नितिमत्तेमुळे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

यावेळी चिंचवली ग्रामपंचायतीचे सदस्य शैलेश महाडीक, शैलेश महाडिक सदस्य ग्रामपंचायत चिंचवली, संतोष भोसले, अमीर भोसले,सचिन बेर्डे, समीर भोसले, अनिल भोसले, बाळकृष्ण सुतार, कृष्णा धोंडू तटकरे , सुमित येलकर, विजय गुडेकर यांच्यासह अन्य समर्थक आणि गोरेगांव शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश यादव आणि त्यांचे समर्थक यांनी आ. गोगावले यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आ. गोगावले यांनी स्वागत केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test