Type Here to Get Search Results !

श्रीवर्धन मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसचा परतीचा प्रवास सुरु - जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांचे प्रतिपादन


श्रीवर्धन मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसचा परतीचा प्रवास सुरु - जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांचे प्रतिपादन

● आम्ही दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणत नाही - खासदार तटकरेंवर टीका


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


   श्रीवर्धन मतदारसंघातील विकास कामांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रेय घेत आहे सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे त्यामुळे जसा आता पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे तशाच प्रकारे आता श्रीवर्धन मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गट) रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी बुधवार, दि.19 ऑक्टोबर 2022 रोजी म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले असून जळजीवन मिशन योजनेच्या नळपाणी योजनांचे भूमिपूजन करण्याचे काम खासदार सुनिल तटकरे करीत आहेत सध्या राज्यात शिंदे - फडणवीस सरकार असून आमची सत्ता आहे त्याचबरोबर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आहेत त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या ज्या योजना मंजूर होतात त्या आमचे सरकारचे माध्यमातून होतात त्यामुळे त्या योजनांचे भूमिपूजन आम्हीच करणार असून दुसऱ्याच्या बापाला आम्ही आपला बाप म्हणत नाही हे देखील खासदार तटकरे यांनी लक्षात घेतले पाहिजे अशी टीका घोसाळकर यांनी केली आहे.
   राज्य सरकारचे माध्यमातून भविष्य काळात आम्ही विकास कामे करून जनतेच्या समस्या सोडविणार आहोत. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला १०० दिवस पुर्ण झाले असल्याने आणि शासनाने जनतेसाठी चांगले निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे असे असताना श्रीवर्धन मतदार संघात खासदार सुनिल तटकरे आणि माजी पालकमंत्री आदिती तटकरे लोकांची दिशाभूल करत असुन त्यांचे पक्ष कार्यकर्त्याला आणि ठेकेदाराला खुश करण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता पत्र नसताना दिनांक २१ ऑक्टोंबर २०२२ रोजी कोळे, कोंझरी, तळवडे आदि गावात भूमिपूजन कार्यक्रम करण्यात येणार आहेत. हे पूर्णतःचुकीचे असून आदरणीय सुनिल तटकरे हे रायगड जिल्ह्याचे खासदार आहेत ते राजे आहेत. राजाने राजा सारखे वागळे पाहिजे असे सुतोवाच बाळासाहेबांची शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेत खुलासा करताना स्पष्ट केले. त्यांनी अधिकपणे सांगताना विकास कामाच्या आड आम्ही येणार नाही.लोकहिताची कामे झाली पाहिजेत पण खासदर आणि माजी पालकमंत्री यांनी राजकरण करू नये. 
केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत जल जीवन मिशन योजने अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामांत श्रीवर्धन मतदार संघात श्रेय घेण्यासाठी तटकरे यांचे प्रयत्न आहेत.माझे ते माझे आणि दुसऱ्याचे तेही माझे अर्थात आमचे आमदार भरतशेट गोगावले नेहमी बोलतात आम्ही दुसऱ्याच्या बापाला आमचा बाप कधी बोलत नाही तसे त्यांनी करू नये असे सांगितले.
मागील अडीच वर्षाचे कालावधीत राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. जिल्ह्यात युतीचे ६ आमदार असताना केवळ उद्धव साहेबांचा आदेश आम्ही स्वीकारला होता.त्यांनी शिवसेनेच्या विकास कामांत अन्याय केला.आम्हाला खुप त्रास देण्यात आला नंतरच्या कालावधीत वातावरण बदलले आणि राज्यात सत्तांतर घडवून आणला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता जिल्हास्तरावर विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करू असे आश्वासन प्रमोद घोसालकर यांनी देताना खासदार सुनिल तटकरे,आमदार आदिती यांना आम्हीच विकास करू शकतो,पदावर असो वा नसो आम्हालाच विकास करता येतो असे समजणे चुकीचे असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. 
म्हसळा शासकिय निवासस्थानी आयोजीत पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांसह श्रीवर्धन मतदारसंघ संपर्क प्रमुख सचिन पाटेकर,म्हसळा तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, उपतालुका प्रमुख प्रविण बनकर, तालुका संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, तालुका संघटक मंगेश शिगवण, सहसंपर्क प्रमुख बबन वाजे, पाभरे विभाग प्रमुख दिपेश जाधव, उपविभाग प्रमुख अरविंद शिंदे, वरवठणे विभागप्रमुख नामदेव घुमकर, अल्पसंख्याक तालुका प्रमुख इम्रान काझी, अल्पसंख्याक उपतालुका प्रमुख सलाम हजवाने, शहरप्रमुख अमर करंबे, शांताराम कोबनाक, सुरेश लोनशिकर,प्रवीण तांबे,मधुकर गायकर,विजय लोनशिकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test