रोहा तालुका मेडिकल चॅरीटेबल असो.ची सीएमई उत्साहात : तज्ञ डॉक्टरांनी केले मार्गदर्शन
अध्यक्ष डॉ. राजेंद्र धात्रक यांचे शिस्तबद्ध नियोजन
रायगड वेध अनिल पवार नागोठणे
नागोठणे-पाली येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रत्येक रुग्णांशी आपुलकीने वागणारे रोहा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र बाबुराव धात्रक यांच्या शिस्तबद्ध नियोजनात रोहा तालुका मेडिकल असोसिएशनची तिसरी सीएमई नुकतीच नागोठणे येथील कामत रिसॉर्ट येथे अतिशय उत्सहात पार पडली. या सीएमई मध्ये नागोठणे, कोलाड, रोहा, तळा, पाली, पेडली, परळी व रिलायन्स टाऊनशिप येथील डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित डॉक्टरांना मोलाचे मार्गदर्शन केले. दरम्यान या सीएमईचे औचित्य साधुन नागोठणे रिलायन्स कंपनीचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. उद्धव कुमार यांचा सपत्नीक रोहा तालुका असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष डॉ. राजेंद्र धात्रक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या वतीने देखील डॉ. उद्धव कुमार यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदेश पाथरे, सेक्रेटरी डॉ. राजेंद्र शिंदे, नवी मुंबई येथील न्यूरोसायक्रटीक डॉ. राहुल भातांबरे, रोहा ता. मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धात्रक, माजी अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील, नागोठणे येथील ज्येष्ठ डॉ.जी. एस. कोकणे, डॉ. रोहिदास शेळके, डॉ. अन्वर हाफीज, नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, असो. चे सेक्रेटरी डॉ. संकेत म्हात्रे, डॉ. पुरोषोत्तम भोईर, डॉ. अभिषेक शहासने, डॉ. नरेश सोष्टे, डॉ. चिन्मय ओक, डॉ. रुपेश होडबे, डॉ. विनोद गांधी, डॉ. तेजकुमार अपणकर, डॉ. अपुर्व क्षीरसागर , डॉ. प्राजक्ता शहासने आदींसह जिल्हा असोसिएशनचे व तालुका असोसिएशनचे डॉक्टर बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन रोहा तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने सीसीएमपी कोर्स पास झालेल्या रोहा, सुधागड व महाड तालुक्यातील डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. राहुल भातांबरे यांनी मानसिक ताण, तणाव, व्यसनमुक्ती यांची लक्षणे व औषधपोचार याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. ता. असो. चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धात्रक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण आपल्या ता. असो.च्या डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांच्या मागदर्शनाचा लाभ मिळवून दिला याचा मला सार्थ अभिमान असुन या मार्गदर्शनाद्वारे वैद्यकीय शास्त्रातील नवनविन संशोधन, तंत्रज्ञान, औषधपोचार यांची माहिती मिळाली. आपल्या डॉक्टरांचे सतत ज्ञान वाढीसाठी सीएमईचे आयोजन करण्यात येत असुन भविष्यात अशाच प्रकारे सीएमईचे आयोजन करण्यात येईल जेणेकरून मुंबई, नवी मुंबई या शहरांसारखी वैद्यकीय सेवा आपल्या भागात उपलब्ध होईल असे शेवटी डॉ. राजेंद्र धात्रक यांनी सांगितले.
Table games like black jack usually are not practically as profitable – to the casino – as slots. The odds are programmed into the machine because it's introduced to the casino ground and may be be} 원 엑스 벳 changed at periodic intervals, but not throughout play. And if the casino is even remotely crowded, solely play the one. Don't damage another person's good time together with your insatiable urge for food for handle-pulling.
ReplyDelete