पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती करण्यासाठी भविष्यात वाटचाल असेल- खासदार सुनील तटकरे
बोर्ली पंचतन, कार्ले, कोंढेपंचतन,वेळास येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन
श्रीवर्धन मध्ये 100 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेस मंजुरी
रायगड वेध अभय पाटील बोर्ली पंचतन
श्रीवर्धन तालुक्यामध्ये पर्यटन व्यवसायावर आधारित योजना राबविणे यासाठी भविष्यामध्ये वाटचाल असेल तर श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावांतील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आले असून यापुढे देखील विकासात्मक कामांची अंमलबजावणी होत राहील असे वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केले, बोर्ली पंचतन, कार्ले, कोंढेपंचतन येथिल विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
श्रीवर्धन मधील कार्ले बौद्ध समाजाच्या सामाजिक सभागृहासाठी महाराष्ट्र शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेतून सुमारे 7.15 लक्ष रुपये निधीच्या तसेच बोर्ली पंचतन भंडारी समाज स्मशानभूमी मध्ये निवाराशेड उभारणे कामासाठी 5 लक्ष रुपयाच्या निधीतील कामाचे, कोंढे पंचतन येथील 3 लक्ष रुपये मंजूर असलेल्या सभामंडप तसेच वेळास कुणबी समाज सभागृहास सभामंडपास 3. 57 लक्ष रुपये मंजूर असलेल्या कामाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष दर्शन विचार, दिवेआगर सरपंच उदय बापट, बोर्ली पंचतन सरपंच ज्योती परकर, उपसरपंच नंदकिशोर भाटकर, माजी सभापती सुकुमार तोंडलेकर, बोर्ली पंचतन भंडारी समाज अध्यक्ष मंदार तोडणकर, सचिव शंकर मयेकर, माजी अध्यक्ष नंदू पाटील, प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तोंडलेकर, प्रिया पाटील, समिधा तोडणकर, संतोष पयेर, अभिजित मुकादम, मनोहर परकर, सुधाकर पाटील, सुभाष परकर, वेळास सरपंच आशुतोष पाटील, कार्ले सरपंच शांताबाई पवार, सुरेश तांबडे, वेळास कुणबी समाजाध्यक्ष संकेत मुंडेकर, उपाध्यक्ष सुरेश मुंडेकर, स्वप्नील टेमकर, खालचे कोंढेपंचतन कुणबी समाजाध्यक्ष नाना परबलकर, कृष्णा कदम, सुरेश परबळकर, सुरेश धोपट, प्रदीप मुरकर, कार्ले बौद्ध समाजाचे सुरेंद्र यादव, शशिकांत जाधव, मिलिंद यादव व अन्य उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतामध्ये खासदार सुनील तटकरे म्हणाले की, श्रीवर्धन मध्ये पर्यटनावर आधारित रोजगार वाढिसाठी जास्ती जास्त प्रयत्न करणार असून जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेसाठी देखील तालुक्यामध्ये निधी उपलब्ध करून देण्यास यश लाभले असून आता पर्यंत श्रीवर्धन मध्ये 100 कोटी रुपये पाणी योजनेसाठी मंजूर केले आहेत.
भविष्यात देखील विकासकामांना गती मिळेल असा विश्वास सुनील तटकरे यांनी दिला.