Type Here to Get Search Results !

बोर्ली पंचतन आगरी समाजाच्या वतीने किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिबीर संपन्न


किशोरवयीन मुलींची जडणघडण महत्त्वाची - वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज तडवी

बोर्ली पंचतन आगरी समाजाच्या वतीने किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिबीर संपन्न


रायगड वेध अभय पाटील बोर्ली पंचतन


सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असला तरी पोषक आहार घेतल्यास महिलांच्या समस्या टाळता येऊ शकतील असे मार्गदर्शन बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज तडवी यांनी केले, बोर्लीपंचतन येथे अखंड आगरी समाज व प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्लीपंचतन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आगरी समाज सभागृहात महिला व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. 

शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जातांना नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी किशोरवयीन मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. या विद्यार्थिनींना किशोर वयाबाबतचे शास्त्रीय ज्ञान व आरोग्य विषयक माहिती असणे आवश्यक आहे. शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे यास्तव बोर्ली पंचतन येथे अखंड आगरी समाज व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने किशोर वयीन मुली व महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुरज तडवी, सेवाभावी व्यक्तीमत्व डॉ.राजेश पाचारकर,आरोग्य सेवक संजय हासपाटील, अखंड आगरी समाज अध्यक्ष वैभव पाटील, उपाध्यक्ष संतोष कांबळे, सचिव सचिन पयेर, खजिनदार प्रज्योत पयेर, महिला अध्यक्षा भूमी कांबळे, माजी अध्यक्ष विष्णू धुमाळ, गणेश पाटील, गावपाटील शरद पाटील, खोतीप्रमुख समीर पाटील, दताराम पाटील, नरेश पयेर, गणेश कांबळे, नरेश पाटील, आरोग्य सेविका सुजाता पाटील, परीचारीका आकांक्षा मयेकर, तृप्ती परकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर समाजबांधव भगिनी उपस्थित होते.  
       सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.यात शारीरिक आजारांसोबत मानसिक आजारांचेही वाढलेले प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. स्रियांना परमेश्‍वराने अफाट शक्ती व सहनशीलता दिलेली आहे पण खरंच, महिला किती कष्ट करतात आणि त्यापेक्षा किती त्रास सहन करतात हे सर्वसामान्य माणसाच्या ताकदीच्या देखील पलीकडचे आहे. घरातील कामे, बाहेरची कामे आणि त्याबरोबरच भावनिक व मानसीक चढउतार ह्या सर्वांचा महिलांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होत असतो. महिला त्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.महिलांनी आपल्या आरोग्या बाबत जागृत राहून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले रहावे यादृष्टीने आरोग्य मार्गदर्शन शिबीराच्या माध्यमातून महिलांना होणारे विविध आजार व समस्या त्यावर योग्य उपचार व आहार अशा विविध विषयांवर बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज तडवी तसेच डॉ.राजेश पाचारकर व आरोग्य सेवक संजय हासपाटील यांनी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर किशोरवयीन मुलींच्या मासीक पाळीबाबतचे अज्ञान व त्याबाबत उद्भवणाऱ्या समस्या यावर आरोग्य सेविका सुजाता पाटील व परीचारीका आकांक्षा मयेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महीलांची रक्त तपासणीही करण्यात आली व त्यांना फाॕलीक अॕसीडच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test