Type Here to Get Search Results !

घोणसे घाट भविष्यांत शून्यअपघात प्रवण क्षेत्र बनविणार :खासदार सुनिल तटकरे


घोणसे घाट भविष्यांत शून्यअपघात प्रवण क्षेत्र बनविणार :खासदार सुनिल तटकरे 


रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा


दिघी-पुणे राष्ट्रिय मार्गावरील माणगाव म्हसळा हद्दीतील घोणसे घाटातील शेवटच्या तीव्र उतार वळणावर नवीन पर्यायी मार्ग व्यवस्था करण्यात आली असतानाही एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात.घाटांतील शेवटच्या तिव्र वळण- शिघ्र उतारावर  बांधकाम सदोष करण्यात आल्याचे निदर्शनास येते, स्थानिक पत्रकार, संघर्ष समितीचे पदाधिकारी, लोकप्रतीनिधी रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करुन मिळावी यासाठी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या कडे आग्रही भूमिका मांडतात . खासदार तटकरे यांनी याची तातडीने दखल घेत रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे समावेत एम.एस.आर. डी.सी.आणि संबंधीत खात्यांचे शासकिय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन घाट रस्ता दुरूस्ती करण्याचे आदेश दिले असता येथे लागलीच कार्यवाही करण्यात येत आहे.दिनांक २१ ऑक्टोंबर २०२२ रोजी खासदार तटकरे यांनी म्हसळा तालुका नियोजीत दौऱ्यात घोणसे घाट अपघात स्थळाची प्रत्यक्ष पाहाणी केली असता अपघात स्थळावर नेमक्या कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या सुधारणा करणे बाबत आपण विशेष पाठपुरावा करू असे सांगून घाटातील अपघात प्रवण क्षेत्रात शुन्य अपघात होतील याची दक्षता घेतली जाईल.वाहतुकीचा वापर करण्याचे प्रमुख क्षेत्र त्याच्या तांत्रिक आणि आर्थिक वैशिष्ट्यांवर आधारित आहे परिवहनाच्या पायाभूत सुविधांच्या स्थानावर ,देशाच्या किंवा शहराच्या श्रेणीवर परिणाम होत असतो.परस्परसंवादाच्या बाबतीत, रस्ता वाहतूक नेहमीच विशेष भूमिका बजावते घाट रस्त्यांत सुधारणा झाल्यावर घोणसे परिसरापासून संपूर्ण म्हसळा तालुक्याचा भविष्यात विकास होणार आसल्याचे यावेळी तटकरे यानी सांगितले.घोणसे घाट अपघात स्थळाची खासदार सुनिल तटकरे पाहाणी करताना त्यांचे समावेत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर बनकर,बबन मनवे, प.स. माजी सभापती छाया म्हात्रे, उपसभापती मधुकर गायकर,संदीप चाचले,सरपंच अनिल बसवत,संतोष उर्फ नाना सावंत आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test