७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वदेस फाउंडेशनच्या वतीने स्वप्नातील गाव म्हणून लोहारे गावचा सन्मान
रायगड वेध ऋषाली पवार लोहारे पोलादपूर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे अवचित्य साधून कोकणातील ६ तालुक्यातील ७५ गावे स्वप्नातील गाव म्हणून स्वदेश फाउंडेशन मार्फत घोषित करण्यात आली यामध्ये पोलादपूर तालुक्यातील लोहारे गावठाण या गावाची निवड झाली.
लोहारे गावांमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत रस्त्यावरील पथदिवे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, गावामध्ये स्वच्छता तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिराच्या आयोजन केले जाते मुलांसाठी डिजिटल शाळा निर्मितीवर भर दिला आहे अशा प्रकारे स्वप्नातील गाव जसे असते त्या पद्धतीने गाव निर्माण केले आहे यामध्ये लोहारे ग्रामपंचायत सरपंच शिवराम पवार तसेच त्यातील सदस्य व ग्रामस्थ स्वदेस गाव विकास समिती अध्यक्ष राजेश नरे सचिव सीमा साळुंखे व अन्य सदस्य यांचे खूप मोठे योगदान आहे.
स्वदेस फाउंडेशन तर्फे लोहारे गावांमध्ये फळबाग लागवड कुकूटपालन, शेळीपालन, योजना ही राबविल्या आहेत शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप ही उपलब्ध करून दिली गावातील नागरिकांचा आर्थिक सर उंचवावा यासाठी विविध उपाय योजना स्वदेस फाउंडेशन तर्फे करण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी स्वदेस फाउंडेशन संचालक प्रदीप साठे तालुका अधिकारी डॉक्टर नितीन बावडेकर स्वदेश फाउंडेशन वरिष्ठ समन्वयक लहूराज सर विविध क्षेत्रातील सन्माननीय अधिकारी वर्ग आरोग्य विभाग अधिकारी उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून लोहारे गावचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पत्रकार ऋषाली पवार, संदीप जाबडे. गावातील महिला विद्यार्थी वर्ग स्वदेस टीम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.