बोर्ली पंचतन येथील विजया खोत यांचे निधन
रायगड वेध अभय पाटील बोर्ली पंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन चे माजी सरपंच कै. नाना खोत यांच्या पत्नी तसेच माजी उपसरपंच व पत्रकार लीलाधर खोत यांच्या मातोश्री विजया खोत यांचे वयाच्या 81 व्या वर्षी आकस्मिक दुःखद निधन झाले.
कै. विजया नाना खोत या अतिशय प्रेमळ, सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या कुटूंब वस्तल म्हणून सर्व परिसरात प्रिय होत्या, त्यांचा आकस्मिक मृत्यू 29 सप्टेंबर रोजी रात्री 11 च्या सुमारास त्यांच्या 81 व्या वाढदिवसा दिवशीच झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. हायकोर्ट वकील अनंत खोत, भंडारी समाज संघटना बोर्ली पंचतन चे माजी अध्यक्ष दत्तात्रेय खोत, पत्रकार व माजी सरपंच लीलाधर खोत व श्रीवर्धन मध्ये कार्यरत असणाऱ्या किर्तीमालिनी संतोष तोडणकर यांच्या त्या मातोश्री आहेत. तसेच जावई, सुना नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेस पंचक्रोशीतील अनेक नागरिक, नातेवाईक मंडळी उपस्थित होते. तर त्यांचे दशक्रिया विधी शनिवार 8 ऑक्टोबर तर उत्तरकार्य रविवार 9 ऑक्टोबर रोजी बोर्ली पंचतन येथे करण्यात येणार आहे.