दिवेआगर,वेळास-आगर खाडीवर पुलाची मागणी,पर्यटन आणि सौंदर्यात होणार वाढ...
रोजगाराला चालना,दोन्ही गावांना पर्यटनाचा फायदा. पर्यायाने आजूबाजूच्या गावांना
खा.सुनिल तटकरे साहेब यांच्या भाषणात अनेकदा उल्लेख, मात्र प्रतीक्षा कायम.
पाच कि.मीटरचा प्रवास तीन मिनिटात
रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर
श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेशाची सुवर्ण भूमी मौजे-दिवेआगर व मौजे-वेळास-आगर या मध्ये एक छोटी खाडी आहे.अतिशय सुंदर आणि देखण्या खाडीवर पूल व्हावा अशी कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे,या प्रस्थावित असलेल्या पूलाची मागणी आता जोर धरू लागली आहे.यामुळे पाच किलो मीटरचा प्रवास केवळ तीन मिनिटात होणार आहे.त्या बरोबरच श्रीवर्धन,हरिहरेश्ववर,जंजिरा किल्ला येथे आलेल्या पर्यटकांचा ओघ दिवेआगर-हरिहरेश्वर कडे असतो.शिवाय या खाडीवर पूल झाल्यास वेळास-आगरच्या येथील सुंदर समुद्र किनाऱ्याचा मनमुराद आनंद,आस्वाद घेता येईल शिवाय वेळास गावाला पर्यायाने आजूबाजूच्या गावांना त्याचा फायदा होणार आहे.
या बाबतचे वृत्त माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅ. ऐ.आर.अंतुले यांच्या स्वप्नातील रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग,आता आताचा चर्चेत असलेला कोस्टल हायवे या मार्गावरील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिवेआगर-वेळास खाडी वरील हा त्या काळातील प्रस्थावित पूल.परंतु बॅ.अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या अल्प कालावधी मुळे या मार्गाच्या कामाला चालना न मिळाल्याने रेवस ते रेड्डी मार्गावरचा हा या खाडी वरील पूल राज्य शासनाच्या कागदावरच राहिला.मात्र गेल्या १०/१५ वर्षातील सरकारच्या काळात कोस्टल हायवे महामार्ग पुन्हा चर्चेत येऊ लागला.या मार्गाचे काही ठिकाणी काम सुरू आहे.
सन नोव्हेंबर १९९७ रोजी दिवेआगर येथे सुवर्ण गणेश मूर्ती एका नारळी-फोपळीच्या बागेत सापडली आणि दिवेआगर ला पर्यटकांचा लोंढा वाढु लागला.महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या इतर प्रांतातुन असंख्य श्रद्धावान गणेश भक्त दर्शना साठी येऊ लागले.
श्रीवर्धन तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलं आहे.निसर्गरम्य समुद्राला शुभ्र वाळूचा किनारा लाभला आहे.हिरव्या गार नारळी-फोपळीच्या बागा,लागत सुरुंची लागवड जणू हिरवीगार किनार असलेला जणू पदरच.निळ्याशार शुभ्र फेसाळलेल्या लाटा अशा नयनरम्य सौंदर्याने इथे आलेल्या प्रत्येकाला भुरळ घातली आणि बघता बघता दिवेआगर एक सुंदर,रमणीय पर्यटन स्थळ नावारूपाला आलं आणि बघता बघता श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढु लागला.दिवेआगर लागत असलेल्या वेळास गावात दिवेआगर वासियांची भातशेती,आंबा,नारळाच्या बागाही आहेत.रोजगाराचा साधन म्हणून वेळास परिसरातील काही मंडळी रोजगारा साठी दिवेआगरला जात-येत असत.हे लोक कित्येक वर्षे या खाडीतून होडीने प्रवासी प्रवास करत असत.मात्र अंदाजे १०/१५ वर्ष या खाडीतील होडी वाहतूक काही कारणाने बंद झाल्याने वेळास-दिवेआगर ये-जा प्रवास बंद झाला.आणि तीन मिनिटांचा प्रवास पाच कि.मीटरने दूर गेला आहे.शिवाय खर्चिक झालाय.राज्य सरकारच्या सम्बंधीत व पर्यटन विकास खात्याने या गंभीर समस्येचा विचार करावा.
वेळास-आगरच्या कुशीत असलेला हा समुद्रकिनारा शुभ्र वाळू,निळ्याशार फेसाळलेल्या लाटा,हिरव्या गार नारळी-पोफळीच्या बागा,सुरूंचे बन आणि निरव शांतता असलेला हा समुद्रकिनारा पर्यटकांना खुणावतोय.म्हणून या खाडीवर पूल झाल्यास पर्यटनात वाढ होईल.शिवाय इथे असलेल्या श्रुष्टी सौंदर्यात आणखी भर पडेल.
या कामी दिवेआगर ग्रामपंचायत व वेळास ग्रामपंचायत प्रयत्नशील आहेत.श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे भाग्य विधाते खासदार सुनीलजी तटकरे साहेब या पुलाचा आवर्जून उल्लेख करतात.मात्र प्रतीक्षा कायम,तटकरे साहेब,श्रीवर्धन मतदार संघातील आमदार,माजी पालक मंत्री कु.अदितीताई तटकरे,आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या कडे पुन्हरमागणी होत आहे.लवकरच या पुलाच्या मागणी साठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांच्या कडेही प्रस्थाव सादर करणार असल्याचे समजते.राज्य शासना कडून या महत्वाच्या पूर्व नियोजित पुलाला मंजुरी मिळावी,ते काम सुरू व्हावं असे या परिसरातील तमाम नागरिकांची मागणी आहे.यामुळे समुद्र किनारपट्टीच्या लगत असलेल्या दिघी ते बागमंडले,हरिहरेश्वर पासून नानवली,सर्वे,आदगांव,वेळास,वेळास-आगर, दिवेआगर,भरडखोल,कोंडविली,शेखाडी,आरावी,वाळवटी या गावांना व एकंदरीतच श्रीवर्धन-म्हसळा या तालुक्यांना रोजगार निर्मितीचा फायदा होईल याकरिता आगर-वेळास,दिवेआगरच्या सुंदर खाडीवर अति महत्वाचा पूल व्हावा यासाठी स्थानिक नागरिकांची राज्य कर्त्यांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे..