Type Here to Get Search Results !

गोरेगांवमध्ये विविध कामांचे लोकार्पण आणि वाढदिवस अभिष्टचिंतन सोहोळा संपन्न


गोरेगांवमध्ये विविध कामांचे लोकार्पण आणि वाढदिवस अभिष्टचिंतन सोहोळा संपन्न

खा. सुनिल तटकरे, आ. अदिती तटकरे यांची उपस्थिती


रायगड वेध गिरीश गोरेगावकर माणगाव


         गोरेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विकासकामांचे लोकार्पण, आणि ज्येष्ठ नेते विजयराज खुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन आणि नवदुर्गांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रायगडचे खासदार सुनिल तटकरे, आ. अदिती तटकरे यांच्यासह लोकनेते विजयराज खुळे, श्रीनिवास बेंडखळे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठकारेच्या जिल्हा संघटीका श्रीमती दीपश्री पोटफोडे, विकास गायकवाड, दिलीप शेठ, सरपंच जुबेर अब्बासी, उपसरपंच विनोद बागडे यांच्यासह सन्मानिक होणार्‍या नवदुर्गा, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्राला डॉ. बाबासाहेबांनी जे संविधान दिले आहे, त्यामुळे हा देश अखंड राहिला. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब या दोन महनिय व्यक्तिंनी महाराष्ट्रावर अधिराज्य केले. महाराष्ट्राने आपल्या देशाला विचार दिला. मंडल कमिशन अहवालाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. २०१९ ला महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेला खर्‍या अर्थाने बळकटी आली. आजचा कार्यक्रम राजकीय नसला, तरी एका राजकीय व्यक्तिमत्वाचे अभिष्ठचिंतनाचा कार्यक्रम आहे. विजयराज तरुणपणी जिल्हा परिषदेत निवडून गेले. त्यांनी ज्या विचारांचे नेतृत्व स्वीकारले, तो विचार बळकट करा, या शब्दांत विजयराज खुळे यांना खा. सुनिल तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या महिलांचा आज सन्मान होत आहे. या महिला कर्तृत्वाने मोठ्या आहेत. ग्रामपंचायतीने त्यांचा सन्मान केला. ही त्यांची पहिली इनिंग झाली, आता यापुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि राज्यस्तरावर आपल्या कार्याची दखल घेईल, असे कार्य तुमच्या हातून घडो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ. अदिती तटकरे, श्रीनिवास बेंडखळे, दीपश्री पोटफोडे यांनीही आपल्या मनोगतातून विजयराज खुळे आणि नवदुर्गानां शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, गावतलाव येथे क्रीडा साहित्याचे लोकार्पण, सुधारित नळपाणी योजनेचे भूमिपूजन आणि स्वातंत्र्य सैनिक कै. नथुराम शेठ चौकाचे नामकरण खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.  
यावेळी शिक्षण क्षेत्रात कविता जंगम, पोलिस विभागात मंगला टेमकर, आरोग्य विभागात रजनी चव्हाण, सामाजिक क्षेत्रात ॲड सदफ येलुकर, स्वच्छता विभागात मंदा पैलकर, आशाताई साक्षी भोकरे, आदर्शमाता इशरत टोल व क्रीडा क्षेत्रात कु. कीर्ती ढेपे यांना महिला नवरत्न म्हणुन गौरण्यात आले.
फोटो लाईन - श्री विजयराज खुळे यांचे अभिष्टचिंतन करताना खा. सुनील तटकरे व माजी पालकमंत्री आदिती तटकरे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test