खासदार सुनिल तटकरे यांचा आगरदांडा टर्मिनल, दिघी पोर्ट, अदानीग्रुप कामगार संघटनेच्या वतीने भव्य सत्कार
रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन,मुरुड तालुक्यातील दिघी आणि राजपुरी खाडीत जागतिक दर्जाचे पोर्ट विकसित होत असतांना स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कामगारांना अनेक अडचणी,समस्या येत असतात, वेतनाचा विषय असतो.चांगल्या सुविधा मिळाव्या. यासाठी व्यवस्थापने कडे बैठका,सतत चर्चा कराव्या लागतात.हे काम संघटना करत असतात.अशा वेळी रायगड,रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार,कार्य सम्राट सुनीलजी तटकरे यांनी या दोनही साईडचा १२७ कामगारांच्या न्याय हक्का साठी ठामपणे उभे राहिले.
कृतज्ञता व्यक्त करण्या करीता रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी अदानी ग्रुप दिघी पोर्टच्या मुख्य दरवाजा समोरील परिसरात आगरदांडा टर्मिनल,दिघी पोर्ट येथील स्थानिक कामगारांना न्याय हक्क मिळवून दिल्याबद्दल जनरल मजदूर सभा ठाणे युनियनचे अध्यक्ष संज्योत वढावकर मॅडम साहेबा,जनरल मजदूर सभा युनियनचे जनरल सेक्रेटरी संजयजी वढावकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये १२७ कामगारांना कायम स्वरूपी कामात समाविष्ट करण्या करता अदानी व्यवस्थापन यांच्या बरोबर वारंवार बैठका घेऊन स्थानिक कामगारांना कायम स्वरूपी काम करण्या करता आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी मोलाची जबाबदारी पार पाडल्या बद्दल कामगारांच्या वतीने कृतज्ञता व्यक्तता म्हणून भावपूर्वक आभार प्रदर्शन आणि आदर पूर्वक भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी दिघी,आगरदांडा परीसरातील आजू-बाजूच्या गावांतील नागरीकांना,युवा पिढीला रोजगार निर्मिती करीता या अदानी ग्रुपचा मोठा उपयोग होणार आहे.कामगाराचे प्रश्न खुप प्रयत्नाने सोडवले त्यासाठी जनरल मजदूर सभेचे सहकार्य खुप मोलाचे आहे.श्रध्दा व सबुरी साई बाबांच्या मंत्रा प्रमाणे आणि कामगारांच्या सबुरीमुळे आज हे चांगले दिवस आले असे खासदार सुनील तटकरे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
कार्यक्रमाच्या वेळी पंचक्रोशीतील मान्यवर तसेच दिघी कोळी समाजाचे सर्व पदाधिकारी, मुस्लिम समाजाचे सर्व पदाधिकारी, तसेच नव बौद्ध समाजाचे सर्व पदाधिकारी आगरदांडा भंडारी समाज अध्यक्ष,रा.कॉ.प.तालुका अध्यक्ष दर्शन विचारे,सुकुमार तोंडलेकर,आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
कार्यक्रम व्यवस्थित संपन्न होण्याकरिता दिघी पोर्ट आगरदांडा टर्मिनल युनियन अध्यक्ष सूरज मांजरेकर, संदिप दिवेकर,राजकुमार कोलथरकर,तसेच कार्यक्रमा ठिकाणी पंचक्रोशीतील मान्यवर विकी कोळी समाज अध्यक्ष किरण कांदेकर,गोविंद गुणाजी,अनंत मेंदाडकर सर,मुस्लिम समाज अध्यक्ष साजिदभाई कर्जीकर, मन्सूरभाई कादिरी,बौद्ध समाज अध्यक्ष राजेश कासारे तसेच दिघी कोळी समाजाचे सर्व पदाधिकारी, मुस्लिम समाजाचे सर्व पदाधिकारी,नवबौद्ध समाजाचे सर्व पदाधिकारी, आगरदांडा भंडारी समाज अध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
कार्यक्रम व्यवस्थित संपन्न होण्या करिता दिघी पोर्ट चे युनिट अध्यक्ष.सुरज मांजरेकर,उपाध्यक्ष संदीप दिवेकर,अनंत खोपटकर, सल्लागार.राजकुमार कोलथरकर,चंद्रकांत भालदार,सेक्रेटरी मनोहर पाटील,सत्येंद्र कासारे,नरेश मेंदाडकर तसेच आगरदंडा पोर्ट युनिट अध्यक्ष विरेंद्र मासाळ, प्रथमेश वीरकूड,विरेंद्र चिंदरकर,ऋत्विज मकु, जनरल मजदूर सभा युनियनचे नेते सन्माननीय संजयजी वढावकर साहेब,राणे मॅडम,युनियनचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सुहास खरीवले,कदम साहेब,अनंतराव देशमुख साहेब. वरील सर्व मान्यवरांनी एग्रीमेंट संपन्न होण्या करिता मोलाचे सहकार्य केले आहे.कार्यक्रमाची शोभा वाढवण्यास व्यास पिठावर मॅनेजमेंटचे नरेंद्र रावल साहेब सन्माननीय कर्नल अरविंद सिंग बेदी साहेब उपस्थित होते.
युनियनच्या दोनही सभासदांनी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याने सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.