Type Here to Get Search Results !

धडाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप पोमण यांना पोलीस अधीक्षकांकडून शाबासकी


धडाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप पोमण यांना पोलीस अधीक्षकांकडून शाबासकी


रायगड वेध श्रीकांत शेलार दांडगुरी


श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांना पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी शाबासकी दिली आहे. जानेवारीते ऑगस्ट कालावधीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या गुन्हे उघडकिस आणल्या आणल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पोमण यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की जानेवारी ते ऑगस्ट 2022 या कालावधीत दिघी सागरी पोलीस ठाणे येथे एकूण दाखल सात गुन्ह्यांपैकी ६ गुन्हे उघडतील आणून त्या विविध गुन्ह्यांमध्ये एकंदरीत ३५५५६४ इतका मुद्देमाल चोरीस गेलेला असून त्यापैकी २८५५६४ इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोमण यांच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले. पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने तसेच वैयक्तिकरित्या लक्ष घातल्याने गुन्हे उगाच सेनेच्या आणि मालमत्ता हस्तगत करण्याचा प्रमाणात वाढ झाली असून भविष्यात आपल्याकडून अशाच भरीव कामगिरीची अपेक्षा आहे अशा अधीक्षक दुधे यांनी म्हटले आहे. दरम्यान, विविध गुन्ह्याची उघड करण्याबरोबरच स.पो.नि.संदिप पोमण यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्यात वडवली येथील महिलांच्या निवेदनाच्या मान सन्मान राखत आपल्या सहकाऱ्यांसह दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्या ज्या ठिकाणी हातभट्टी दारूचे धंदे सुरू होते त्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन ते धंदे उध्वस्त केलेच पण पुन्हा कोणी हातभट्टी दारू धंद्याच्या धाडस करणार नाही या दृष्टिकोनातून कारवाई केले व अनेक वर्ष असलेले हातभट्टी दारूचे धंदे भोई सपाट केले भोई सपाट करण्यात दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आला असल्याचे पहावयास मिळत आहे काहीजण अंधाराचा फायदा घेत हातभट्टी लावून ते दारू काही ठिकाणी विकत असल्याचे निवेदन देणाऱ्या महिलांकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती त्याच आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन हातभट्ट्या उध्वस्त केल्या होत्या. दुसरीकडे दिघी सागरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या वडवली गावात दारूचे अवैध धंदे राजरोजसपणे चालू असल्याचे वडवली येथील महिलांनी लेखी निवेदनात म्हटले होते त्यानुसार कारवाई करत त्यांनी या अवैध धंद्याना आळा घातला जवळपास शंभर वर्ष जुने हातभट्टी अवैध धंदे उध्वस्त करणाऱ्या पोमण यांचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांना पोलीस अधीक्षकांनी शाबासकी दिली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test