दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावरील घोणसे घाटांत ट्रेलरला भिषण अपघात २ मृत आणि ३ गंभीर जखमी.
ट्रेलरची केबीन संरक्षण भिंतीवर जोरदार धडल्याने मृत- गंभीर जखमींत वाढ
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावरील म्हसळा तालुक्यातील अपघाताचा कर्दनकाळ ठरत असलेल्या घोणसे घाटांत योग्य त्या उपाय सदोष सस्त्यांत दुरुस्त्या शासन आणि म.रा.र.विकास मंडळ करत नसल्याने दिवसेंदिवस घाटात एकाच ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे असे वारंवार दिसते.
आज बुध दि.५ रोजी सकाळी ७ते ७.१५ च्या दरम्यान MH 43/Y-7664 या सीमेंट ब्रिक्सने भरलेत या ट्रेलरचा भिषण अपघात होऊन किमान २ मृत आणि ३ गंभीर असावेत असे सातत्याने मदत करणाऱ्या मंडळीनी सांगितले, ३०ते ३५ टनी क्षमतेचा ट्रेलर या वाहनाचे पुढचे केबीनचा सरक्षण भिंतीने चक्काचूर केला, आणि बळीही घेण्याची घटना घडली. मृतांमध्ये ५५ते ६० वयाची चांदोरला बसलेली महीला प्रवासी असावी हा जाणकारांचा अंदाज आहे.
कोणत्या आभ्यासाने संरक्षण भित बांधली हा चर्चेचा विषय आहे. अपघाताचे वृत्त कळताच देवघर -घोणसे येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अनिल महामुनकर,अमोल कोतवाल,सचिन महामुनकर सुरेंद्र शिर्के विलास कदम ,योगेश महागावकर,अमोल गणवे,शरद कांबळे आणि ठेकेदार जे.एम. म्हात्रे यांच्या कर्मचाऱ्यानी प्रथमता जखमीना, मृताना ग्रामिण रुग्णालयात पाठविले.
अपघाताचे वृत्त कळताच स.पो.नी संदीपान सोनावणे आणि पोलीसानी अपघात स्थळी धाव घेतली.