Type Here to Get Search Results !

दिघी अगरदांडा फेरीबोट सेवेत प्रवाशांची होणारी लुटमार थांबली


दिघी अगरदांडा फेरीबोट सेवेत प्रवाशांची होणारी लुटमार थांबली


सुवर्णदुर्ग शिपिंग सेवेकडून वाढीव तिकिटाने होत होती प्रवाशांची लुटमार, बातमीचा दणका


पण मागील दिड वर्षे केलेल्या लुटमारीच्या भरपाईच काय? 
 
 सुवर्णदुर्ग शिपिंग कडून मागील दिड वर्षे केलेल्या तिकिट लुटमारीची भरपाईच काय? 


भरपाई घेण्याची प्रवासी वर्गातून मागणी



रायगड वेध अभय पाटील बोर्ली पंचतन


श्रीवर्धन व मुरुड तालुक्याच्या मध्ये असणारी राजपुरी खाडीमध्ये आगरदांडा- दिघी - आगरदांडा सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस व दिघी जलवाहतूक सोसायटी ह्या दोन कंपनीची रो रो सेवा सुरू आहे दोन्ही रो रो सेवेचे तिकीट दर वेग वेगळे होते,  सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस चे तिकीट दर हे दिघी जलवाहतूक सोसायटीच्या तिकीट दरापेक्षा जास्त म्हणजे कमीतकमी 25 रुपये व त्यापेक्षा अधिक असल्याने सुवर्णदुर्ग शिपिंग कडून गेली दिड वर्षे प्रवाशांची लूटमार होत असल्याबाबत 29 सप्टेंबर 2022 रोजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते यामुळे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे डोळे उघडल्याने वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर 10 दिवसाने म्हणजेच आज रविवार 9 ऑक्टोबर 2022 पासून सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस ने आता प्रवाशांची लूटमार थांबविली असून आता दोन्ही रो रो सेवेचे तिकीट सारखे करण्यात आले आहेत यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत असले तरी मागील दिड वर्षांमध्ये सुवर्णदुर्ग शिपिंग प्रशासनाकडून झालेल्या प्रवाशांच्या लुटमारीची भरपाई कोण घेणार , प्रशासनाने सदर भरपाई घ्यावी अशी मागणी प्रवासी वर्गातून आता होत आहे. 

   श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग या ठिकाणच्या पर्यटन वाढीमध्ये रो रो सेवेचा मोठा हातभार आहे. राजपुरी खाडीमध्ये चालणाऱ्या आगरदांडा- दिघी - आगरदांडा सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस व दिघी जलवाहतूक सोसायटी ह्या दोन कंपनीच्या रो रो (फेरीबोट) सेवा सुरु आहेत, महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेसला डिसेंबर 2020 ला पुढे फक्त 3 महिन्यांसाठी तिकीट दर वाढ करण्याची अनुमती देण्यात आली होती म्हणजेच मार्च 2021 नंतर त्यांनी वाढीव दर बंद करून पूर्वीचे कमी दरानुसार तिकीट आकारणे गरजेचे असताना, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून वाढीव दराची पुन्हा कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसताना दीड वर्षे सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस यांच्या कडून या मार्गावर प्रवाशांची लूट होत होती, प्रवाशांची चाललेली लूट महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या संगनमताने चालली असल्याची चर्चा व चीड प्रवाशां मधून व्यक्त होत होती तसेच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या कडून मागील दिड वर्षे यावर कोणतीही कारवाई न झाल्याने अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. 

 या वृत्ताने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला जाग आली व मुंबई येथील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मुख्यालयामध्ये सभेचे सत्र सुरू होते अखेरीस यावर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेसला ममेबो/मुकाअ/वाह-1/4386 दिनांक 7 ऑक्टोबर 2022 च्या पत्रान्वये आदेश देत तिकीट दर कमी करण्याबाबत सांगितले त्यानूसार आजपासून म्हणजेच 9 ऑक्टोबर 2022 पासून तिकीट दर कमी करण्यात आले आहेत आता दोन्ही फेरीबोट सेवेचे तिकीट दर सारखे झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. परंतु मार्च 2021 पासून काल पर्यंत सुवर्णदुर्ग शिपिंग प्रशासनाने केलेली लुटमारीची भरपाईच काय ? प्रशासनाने सुवर्णदुर्ग शिपिंग कडून भरपाई घ्यावी व त्याचा लाभ देखील प्रवाशाना मिळावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test