पोस्को कंपनीच्या सीएसआर फंडातून शाळा दुरुस्ती, निर्मिती, शैक्षणिक साहित्य, फळरोपं आणि मास्क वाटप
रायगड वेध गोविंद जांभळे माणगाव
रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक परीसरात स्थीत असलेल्या पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपले सामाजिक दायित्व समजून आपल्या सीएसआर फंडातून लाखो रुपये खर्च करून माणगाव तालुक्याच्या निजामपूर विभागातील एकूण आठ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पाच शाळांची दुरुस्ती व एक शाळेची नवीन वास्तू निर्माण करून त्या शाळांना शैक्षणिक साहित्य तसेच फळ झाडांच्या रोपांचे आणि मास्कचे वाटप केले.
माणगाव तालुक्यातील विळे भागाड एमआयडीसी तथा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या पोस्को महाराष्ट्र स्टील या कोरीयन मल्टी नॅशनल कंपनीने आपल्या शैक्षणिक व सामाजिक उत्तरदायित्त्वाचे भान ठेवून कंपनीच्या सीएसआर फंडातून आपल्या कंपनीच्या निजामपूर विभाग परिसरातील चक्रीवादळात नुकसान झालेल्या राजिप शाळा सांगी या प्राथमिक शाळेसाठी सुमारे साडे चोवीस लाख रुपये खर्च करून नवीन सुसज्ज इमारतीचे निर्माण केले. तसेच राजिप शाळा कसबेवाडी या प्राथमिक शाळेच्या इमारती च्या दुरुस्ती साठी सुमारे सहा लाख रुपये खर्च, तसेच राजिप शाळा उंबर्डी इमारत दुरुस्ती साठी सुमारे साडेसहा लाख रुपये खर्च, तसेच राजिप शाळा यलवडे करीता साडेतीन लाख रुपये खर्च, तसेच विळे येथील एच एम मेथा हायस्कूल इमारती करीता सुमारे पंचवीस लाख रुपये खर्च करून उपरोक्त शाळांना शैक्षणिक साहित्य आणि फळझाडे रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच या विभागातील हजारो शेतकर्यांना तीन हजार चारशे सत्तावीस फळझाडं रोपांचे आणि हजारो मास्क चे वाटप करण्यात आले.