Type Here to Get Search Results !

राज्यातील गोर-गरीबांची दिवाळी साजरी होण्यासाठी सरकारची ही भेट : आ. रविंद्र पाटील


राज्यातील गोर-गरीबांची दिवाळी साजरी होण्यासाठी सरकारची ही भेट : आ. रविंद्र पाटील

नागोठण्यात "आनंदाची शिधा" किटचे वाटप


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून जनतेसाठी अनेक नवनवीन योजना सरकारकडून राज्यात राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यातील गोर-गरीबांची दिवाळी साजरी होण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारची ही छोटीशी भेट असल्याचे प्रतिपादन पेण-सुधागडचे आमदार रविंद्र पाटील यांनी नागोठण्यात केले. 

सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शिधा पत्रिकाधारकांना १०० रुपयांत साखर, रवा, चणाडाळ आणि एक लिटर पामतेलाचा शिधासंच (आनंदाचा शिधा संच) देण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. त्याची सुरुवात आज रोहा तहसील अंतर्गत नागोठणे ग्रामपंचायतीमधील बाजारपेठेत असलेल्या नागोठणे क्र. ४ या शिधावाटप दुकानात करण्यात आली त्यावेळी आ. रविंद्र पाटील बोलत होते. 

या कार्यक्रमाला राजिपचे माजी सदस्य नरेंद्र जैन, नागोठण्याचे सरपंच डाॅ. मिलिंद धात्रक, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, रोहा तालुका पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार उज्वला भोईर, अव्वल कारकून अभिजित महाडिक, गोदाम व्यवस्थापक दर्शना पाटील, लेखनिक पूजा जोशी, नागोठणे ग्रा.पं.चे माजी सदस्य जुगन जैन, शिंदे गटाचे युवा नेते मनोज खांडेकर, शिंदे गटाचे नागोठणे विभागप्रमुख प्रवीण ताडकर, शहर प्रमुख अमित खामकर, मंदार कोतवाल, रोशन उंबरे, मयुर ढाणे, आकाश मढवी, शिधा केंद्र संचालक हसमुख हरकचंद जैन, कमलेश जैन आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते. 

अंत्योदय व केशरी कार्डधारकांना हे शिधा संच वाटप केले जाणार आहेत. नागोठणे क्र. ४ या केंद्रावर ७४० शिधा किट देण्यात आले असून नागोठणे शहरासह विभागातील इतर शिधा वाटप दुकांनांतही लवकरात लवकर हे वाटप करण्यात येईल असे रोहा पुरवठा निरिक्षक अधिकारी तथा पुरवठा नायब तहसीलदार उज्वला भोईर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test