रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे सरचिटणीस तथा मुरुड सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल संजय भायदे यांचे पुण्याजवळ अपघातात निधन.
रायगडसह राज्य ग्रंथालय चळवळीत पोकळी
रायगड वेध संजय खांबेटे, म्हसळा
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संध आणि रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे चळवळींत सक्रीय सहभाग असलेले मुरुड (जि. रायगड ) येथील सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल संजय एकनाथ भायदे (रा.मुरुड, वय ५२ वर्षे) यांचे पुण्याजवळ रवीवार दि१८ रोजी रात्री ११ते १२ दरम्यानअपघातात निधन झाले. पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या "उरळी देवाची" गावा लगत रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. इथून जवळ असलेल्या गोडाऊन मधून निघालेला कंटेनर सासवडहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या पंढरपूर-पुणे एसटीच्या आडवा आला.या अपघातात चालक, वाहक आणि त्यामधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले.जखमींत भायदे यांचे सहकारी आणि रायगड, कोकण आणि राज्य ग्रंथालय चळवळींतील पदाधिकारी प्रकाश पाटील (वय ६९रा. शहाबाज,ता.अलिबाग) हे जखमी झाल्याचे सर्व जखमीना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे एस.टी.महामंडळाचे प्रवक्त्याने सांगितले. हा अपघात एवढा भीषण होता की धडकेत कंटेनर आणि शिवशाही बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.पंढरपूर - पुणे या र्दुदैवी शिवशाही बसमधून राज्य ग्रंथालय संघाची कार्यकारणीची पंढरपूर (जि.सोलापूर) येथील बैठक संपवून संजय भायदे आणि प्रकाश पाटील हे रायगड कडे परतीचा प्रवास करीत होते.
" संजय भायदे हे मागील २७ वर्षापासून ग्रंथालय चळवळींत सक्रीय होते, त्यांच्यावर काळानी दुदैवी झेपही ग्रंथालय चळवळीचे कार्य करताना घ्यावी हा ग्रंथालय संघावर आघात आहे.संजय भायदेंची आम्हा सर्वाना पोकळीच ठरेल" असा शोक संदेश संजय बोदार्डे, अध्यक्ष रायगड जिल्हा ग्रंथालय संघ. यानी व्यक्त केला.