माणगाव येथे ड्रोन द्वारे फवारणी चे प्रात्यक्षिकं
माणगाव
रायगड वेध गिरीश गोरेगावकर माणगाव
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा माणगाव व डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २०/९/२०२२ रोजी माणगाव तालुक्यातील कृषि संशोधन केंद्र रेपोली ता.माणगाव येथे कोकण विभागातील पाहिली ड्रोन द्वारे फवारणी चे प्रात्यक्षिकं प्रक्षेत्रावर घेण्यात आले,
या कार्यक्रमास विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे श्री.अंकुश माने व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सौ उज्वला बाणखेले मॅडम प्रमुख उपस्थित होत्या, यावेळी बायर क्रॉप सायन्स कंपनीचे प्रमुख श्री.सुशील देसाई, श्री. खांबेटे व सर्व टीम यांनी ड्रोनद्वारे फवारणी कशी करावयाची याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानचा अवलंब करून तयार केलेले ड्रोनद्वारे फवारणी कशी फायदेशीर आहे, मजुरांवर अवलंबून न राहता ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय वापरावा असे सांगीतले.
यावेळी डॉ. नरेंगलकर, किटकशास्र विभाग दापोली यांनी कीटकनाशक फवारणी करताना काय काळजी घ्यावी याबदल मार्गदर्शन केले. ड्रोन द्वारे फवारणी करताना ५-७ मिनिटा मध्ये एक एकर प्रक्षेत्रावर फवारणी करण्यात आली, यावेळी डॉ.जळगावकर किटकशास्र विभाग कर्जत, श्री.शिवराम भगत सहयोगी संशोधन संचालक कर्जत यांनी उपस्थीत राहून शेतकऱ्यानं मार्गदर्शन केले.
यावेळी श्री आनंद कांबळे उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव, डॉ. डडेमल, श्री. आ. डी.पवार तालुका कृषि अधिकारी माणगाव तसेच तालुक्यांतील ८५ प्रगतशील शेतकरी, कलिंगड, कारली व भाजीपाला उत्पादक शेतकरी , तसेच महाड पाळी, तळा, रोहा येथील कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते,