Type Here to Get Search Results !

गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सव शांततेत आनंदाने साजरा करा - पो.नि. राजन जगताप


गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सव शांततेत आनंदाने साजरा करा - पो.नि. राजन जगताप 

 
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


संपूर्ण विश्‍वाला भयभीत करणारा कोविड संक्रमणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे यंदा सर्व सण, उत्सव धूमधडाक्यात साजरे होतांना दिसून येत आहे. दहीहंडीनंतर झालेला गणेशोत्सव आणि त्यांनतर आता शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार पासून सुरुवात होणार आहे तरी नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहर व परिसरातील गावांमध्ये ज्या शांत पध्दतीने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता आनंदाने उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे आगामी येणारा शारदीय नवरात्रोत्सवही शासनाच्या नियमावली नुसार कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शांततेत आनंदाने साजरा करावा अशी सूचना नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजन जगताप यांनी केल्या. नागोठणे पोलिस ठाण्यात सोमवार दि. १९ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष , सदस्य तसेच शहर व परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन करताना पो.नि. राजन जगताप बोलत होते. 

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पो.नि. राजन जगताप यांनी सांगितले की, नवरात्र उत्सव साजरा करताना ठिक ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते त्यामुळे या ठिकाणी लहान मुले हरवणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच महिलांचे दागिने गहाळ अथवा चोरी होणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.

याचबरोबर गर्दीत महिलांचे दागिने गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी महिलांना कमीत कमी दागिने परिधान करण्यास सांगावे जेणेकरून चोरीच्या घटना घडणार नाहीत. बतावणी प्रकार वाढले आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी जागरूक राहून विशेष काळजी घ्यावी.नवरात्र उत्सवात दांडीया गरबा नृत्य कार्यक्रमात महिलांची छेडछाड होणार नाही याची मंडळाने दक्षता घ्यावी. सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करत असताना मंडळाने कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त स्वंयसेवक उपलब्ध करावेत. ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच विसर्जन मिरवणूकीत डिजे लावण्यास बंदी असेल त्यामुळे बेंजो वाद्यांच्या तालावर उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला पाहिजे. उत्सव साजरा करताना जातीय भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. कार्यक्रम ठिकाणी जास्त क्षमतेचे लाईट लाऊ नका जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.सार्वजनिक नवरात्र उत्सव ठिकाणी मंडळाने चांगली आरोग्य विषयक शिबीर , रक्तदान शिबीर आयोजित करण्यात यावेत तसेच सध्या डोके वर काढलेल्या जनावरांसाठी घातक असलेला लंप्मी या आजरांवर मात करण्यासंदर्भात माहिती शिबिर आयोजित करावेत. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने आपल्या स्वंयसेवकांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावेत. स्वंयमसेवकांनी मद्यप्राशन केलेल्या व्यक्तींना उत्सव ठिकाणांपासून दूर ठेवावेत.काकार्यक्रम ठिकाणी स्फोटक पदार्थ ठेऊ नये.बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करा.कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सामान्य नागरिकांचीच मदत होते, त्यामुळे आपल गाव आपली आळी शांत कशी राहील याचा विचार करुन सण उत्साहात साजरा करत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन शेवटी जगताप यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test